Sunday, November 17, 2019

Balasaheb thakre (New Article 2019)



Balasaheb thakre (New Article 2019)

बाळासाहेब ठाकरे "                                              ( एक युगपूरूष  )                                            ✒लेख -प्रसाद लोगडे    https://konkanbeauty8.blogspot.com      आज (17 नोव्हेंबर )देशातील तसेच महाराष्ट्राच्या राजकीय जगतातील एक महत्वाचे स्थान असणारे शिवसेनाप्रमुख #" बाळासाहेब ठाकरे " यांचा सातवा स्मृतिदिन.हा लेख लिहून स्व.बाळासाहेबांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.  🔵संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि प्रबोधनकारप्रबोधनकार #" केशव सीताराम ठाकरे  " (बाळासाहेबांचे वडील) हे मराठी पत्रकार,उत्तम वक्ते तसेच समाजसुधारक होते. महात्मा फुलेंच्या कार्याचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.#" महात्मा फुले " हे प्रबोधनकारांचे आदर्श होते.प्रबोधनकारांच्या जिवनातील सर्वांत मोठा लढा होता तो "संयुक्त महाराष्ट्राची चळवळ".या चळवळीतील त्यांच्या कामगिरीची बरोबरी महाराष्ट्रात केवळ "प्रल्हाद केशव अत्रे" आणि "काॅम्रेड डांगे" यांच्याशीच करता येईल. स्वतंत्र  भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी म्हणुन संयुक्त महाराष्ट्राचा हा अस्मितेचा लढा होता. आणि तो लढा पुर्ण ताकदीनिशी उभा केला गेला. या लढयाच्या यज्ञकुंडात 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर #1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.अशा समाजसुधारकाच्या घरात #23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे एका नव्या युगपुरूषाचा म्हणजेच बाळासाहेबांचा जन्म झाला.प्रबोधनाच्या पुरोगामी विचारसरणीचा आणि वडिलांच्या आक्रमक स्वभावाचा वडिलांचा वारसा बाळासाहेबां मध्येही दिवसागणिक भिनत होता.अशातच बघता-बघता शालेय शिक्षण पूर्ण झाले.#1950 रोजी   " फ्री प्रेस जर्नल " मध्ये व्यंगचित्रकार म्हणुन नोकरीवर रूजू झाले.प्रेस मध्ये काम करता-करता बाळासाहेबांनी ईतर मासिके,साप्ताहिक,संस्थासाठी व्यंग्यचित्रे काढली.काही उद्योगांसाठी जाहिरातीचे कामं देखील केले.पण एके दिवशी प्रेसमधील दबाव तंत्राला कंटाळून बाळासाहेबांनी तडकाफडकी नोकरी सोडून दिली.                                                            🔴" मार्मिक " साप्ताहिक
मुलापेक्षा एका जातीवंत " कलावंताची " होणारी घुसमट प्रबोधनकारांनी बाळासाहेबांच्या देहबोलीवरून ओळखली होती.शेवटी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनपर आशिर्वादाने व्यंगचित्राची धार असलेलं स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा बाळासाहेबांनी निर्णय घेतला. ऑगस्ट 1960 मध्ये #" मार्मिक " हे साप्ताहिक सुरु केले." मार्मिक " च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन #मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.भांबावलेल्या मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी तसेच प्रस्थापित राजकीय उणीवांची भांडाफोड करून व्यंगचित्राच्या माध्यमातून सामान्य मराठी माणसा पर्यंत मांडण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. मुंबईत जागोजागी रोजगारासाठी होणारी मराठी माणसाची कुचंबणा...जागोजागी होणारा अपमान...अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याची महत्वाची भूमिका "मार्मिक" च्या माध्यमातून बाळासाहेबांनी बजावली.मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा ध्यास आणि मराठी माणसावर अन्याय करणारया शक्तींना प्रथम बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्याच्या गडद फटकारयातून सरळ केले.मार्मिकच्या अंकातील व्यंगचित्रे पाहून प्रस्थापित त्यावेळच्या राजकारणी वर्गातील कित्येकांना घाम सुटत असे.    🔴जन्म " शिवसेना " नावाच्या मराठी वादळाचा.  केवळ व्यंगचित्राने मराठी माणसावर होणारया अन्यायाचं सावट बाजूला होणार नाही, हे बाळासाहेबांनी जाणले होते.यासाठी जाती-पाती मध्ये विखुरलेल्या मराठी माणसाने संघटीत व्हायला हवे.हा विचार बाळासाहेबांना स्वस्त बसु देत नव्हता.एकदिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला " बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही ? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी ? बाळासाहेब बोलले " विचार तर चालू आहे. पण

संघटनेला नाव...प्रबोधनकार बोलले " मी सांगतो नाव    " शिवसेना " अशा प्रकारे शिवसेना या नव्या संघटनेच्या जन्म झाला. बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेशी स्थापना केली.महाराष्ट्रात एवढे उद्योग असुन देखील ईथला भुमिपुत्र रोजगारासाठी वणवण भटकतो आहे.महाराष्ट्रातील बहुतांशी तरूण वर्ग बेरोजगारीमुुुळे दारीद्रयाच्या खाईत खितपत पडला आहे.ईतर वर्ग त्याला जाणुन बूजुन मागे रेटत होता.नोकरी निमित्त बाहेरच्या राज्यातून आलेल्यांची मक्तेदारी आणि मराठी माणसाच्या खच्चीकरणाचे नवनवीन प्रयोग हा उभा लढवय्या महाराष्ट्र पहात होता.पण तो वाट पाहत होता एका ठिणगीची.हि ठिणगी होती स्वाभिमानी मराठी बाण्याची...हि ठिणगी होती मराठी अस्मितेची...हि ठिणगी होती हताश झालेल्या मराठी मनाला आपल्या हक्कासाठी लढायला प्रवृत्त करण्यासाठी.मराठी माणसावर होणारा अन्यायाची जाणीव शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम भुमिपुत्रांच्या लक्षात आणुन दिली.आणि बाळासाहेबांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनातून जाती-पाती मध्ये विखुरलेला मराठी माणूस त्यागाच्या...निष्ठेच्या...भगव्या झेंड्याखाली एकवटला...संघटीत झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966  शिवतिर्थावर              मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून जवळपास 5 लाख लोकांनी सारे शिवतिर्थ फुलून गेले होते.त्या मेळाव्यापासुनच शिवतिर्थ...शिवसेनाप्रमुख आणि मराठी माणसाची तुफान गर्दी हे जणु समिकरणच बनून गेले.
🔴" सामना " मराठी माणसाच्या मनाचे प्रतिबिंब.
बाळासाहेबांच्या कुंचल्या बरोबर त्यांची लेखणी देखील एखाद्या धार-धार तलवारी प्रमाणे तळपत असे.वडील प्रबोधनकार ठाकरे# प्रल्हाद केशव अत्रे यांचा जबरदस्त प्रभाव बाळासाहेबांच्या लेखणीतून प्रकर्षाने दिसून येत असे. व्यंगचित्रकार आणि संपादकीय अग्रलेख या त्यांच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.संघटना वाढू लागली तशी लोकांच्या समस्यां समजावून घेवून त्यावर त्वरीत शिवसेनाप्रमुखांच्या एका आदेशानुसार होऊ लागली.

Balasaheb thakre (New Article 2019)
" मातोश्रीं "वर आणि शिवसेना शाखांमध्ये सामान्य जनतेचा न्यायासाठी ओढा सतत वाढत होता.त्यासाठी संघटनेचे मुखपत्र हवे होते. जेणेकरून बाळासाहेबांना आपले विचार महाराष्ट्रातील तमाम जनतेपुढे मांडता येवु शकतिल. #23 जानेवारी 1989 रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र असलेले " सामना " सुरु झाले. मुंबई,दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात मोठ्या जल्लोषात शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेबांनच्या शुभहस्ते " सामना "चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेबांचे शब्द हिंदूत्वाचा विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांच्या दररोज होणारया आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी #" सामना " हे नवे ब्रम्हास्त्र होते.आणि एका अर्थाने बाळासाहेबांनी या शस्त्राचा वापर आपल्या संघटनेसाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या भल्यासाठी तसेच अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी केला.याच प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाळासाहेब म्हणाले होते.       " सामना " हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे.त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारावी.हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.कारण तो फुटला तर त्याचे तुकडे पडतिल आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रुप दिसेल.आमच्या वृत्तपत्राची भाषा जहाल असेल.तिखट वाटेल,बोचरी असेल.काही वेळा ती असभ्य वाटेल त्यांनी हे वाचतांना विषय समजून घ्यावा.त्या विषयावरील तिडीक व्यक्त करण्यासाठी ती भाषा वापरली जाईल.काहीवेळा जमालगोटाच दयावा लागेल व तो आम्ही देणारच. सामना हा " न्यूजपेपर " आणि " मार्मिक हे "व्ह्यूजपेपर" राहील.आजच्या काळात देखील शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र म्हणुन सामनाची स्वतःची ओळख आहे.आज शिवसेना पक्षप्रमुख आणि "सामना" चे संपादक अशा दोन्ही भूमिका उद्धवजी ठाकरे समर्थपणे पार पाडत आहेत.बाळासाहेबांच्या लेखणीचा आणि निर्भिड विचारांचा प्रभाव असलेले संजयजी राउत हे " सामना "चे कार्यकारी संपादक म्हणुन संपादकीय जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पार पाडीत आहेत.
Balasaheb thakre

समाजकार्य एक व्रत 
बाळासाहेबांनी झुणका-भाकर केंद्रांची योजना,वृध्दांना आधार म्हणुन वृध्दापकाळातील प्रत्येक क्षेत्रातल्या सवलती,झोपडपट्टीवासियांना घरे,मराठी तरुणांचा नोकरीचा प्रश्न,मुंबईतील उड्डाणपूल,मुंबई पुणे द्रुतगती मार्गांचे कामं,मराठी भाषा...पाटयांचा आग्रह...मराठी साहित्य...चित्रपट...नाट्य कलेला अग्रस्थान,Bombay चे मुंबई स्पेलींग अशी अनेक कामे बाळ बाळासाहेबांनी शिवसेनेचेच्या माध्यमातून केली.बाळासाहेबांच्यात आणि त्यावेळच्या ईतर पक्षातल्या राजकीय पुढारयांमध्ये एक मुळ फरक होता.कि बाळासाहेबांनी राजकारणात कधीही कोणत्याही उमेदवाराची जात पाहिली नाही. त्यांना जाती-पातीचे राजकारण अमान्य होते.     " बाळासाहेबांनी "आलेल्या " शिवसैनिकाचे " धाडस पाहिले.महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी आपला एक-एक शिलेदार उभा केला. महाराष्ट्रातील तरूणांच्या सळसळत्या रक्ताचे रूपांतर आपल्या वाणीच्या ताकदीवर त्यांनी महाराष्ट्र प्रेमात केले.बाळासाहेबांच्या शब्दांच्या उर्मीने प्रत्येक माणूस पुन्हा एकदा आपल्या मुलाखत स्वाभिमानाने प्रत्येक क्षेत्रात उभा राहीला.मराठी माणसाच्या स्वप्नांना बाळासाहेबांच्या रूपांन नवे पंख मिळाले.आता हाच भांबावलेला मराठी माणुस आज पाय घट्ट रोवून कोणत्याही वादळाचा सामना करायला उभा ठाकला होता.आता हाच मराठी माणूस नगरपालिका,महानगरपालिका मधून सत्ता पदांवर दिसू लागला होता.सामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकांना " बाळासाहेबांनी " नगरसेवक,आमदार,खासदार,मुख्यमंत्री पदावर बसविले.ही कीमया "बाळासाहेब ठाकरे" नावाच्या वादळी झंझावाताची होती.
Balasaheb thakre (New Article 2019)

🔴मार्मिक ते शिवसेना
बाळासाहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिकांवर नितांत प्रेम केले.त्यांनी "शिवसेना" ही संघटना एखाद्या कुटुंबाप्रमाणं मानली आणि कुटुंबप्रमुख या नात्याने ती जोपासली...वाढवली.प्रवाहा विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि सामान्य मराठी माणसाच्या जोरावर पुन्हा एकदा शिवशाही या महाराष्ट्रात आणुन एक नवा विक्री ईतिहास रचला.एका चळवळीतून संघटना ते सत्तारूढ पक्ष ईथ पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.आता बाळासाहेबांचा        " शिवसेना " नावाचा चार अक्षरी मंत्र थेट मंत्रालयापासुन ते थेट राज्यातिल जिल्हा परीषदा,पंचायत समित्या,ग्रामपंचायतां मध्ये गरजू लागला होता.शिवसेना पक्षाच्या गाव तिथे " शाखा " उभ्या राहिल्या.
🔵बाळासाहेब एक दिपस्तंभ
रोखठोक कार्यपद्धतीमुळे " बाळासाहेब "नेहमीच देशाच्या राजकीय वाटचालीत अग्र स्थानी राहिले."शिवसेना" च्या जडणघडणीच्या प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची अनेक वादळे स्वतःच्या अंगावर झेलली पण त्याची झळ कोणत्याही शिवसैनिकाला लागू दिली नाही.
बाळासाहेब-" माझा शिवसैनिक म्हणजे माझं सर्वस्व आहे,त्यांच्याशिवाय माझ्या शिवसेनेच्या कर्तृत्वाचा अध्याय लिहिलाच जावू शकत नाही. असे आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला थेट कुटुंबप्रमुख                  " शिवसेनाप्रमुखांनी " गौरविले.
🔴शिवतिर्थावरील बाळासाहेबांची अखेरची सभा.
शिवसेनाप्रमुख,हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे -  " जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनिंनो आणि मातानों ".....शिवसैनिक हा माझा प्राण आहे.ही माझी संपत्ती आणि उर्जा आहे असे " सांगत लाखो शिवसैनिकांच्या हृदयावर कित्येक दशके अधिराज्य गाजवणारे...विजेप्रमाणे कडाडणारे बाळासाहेब आज थोडेसे हळवे झालेले भासत होते.या असामान्य नेत्याने आपल्या  शिवतिर्थावरील अखेरच्या भाषणात देखील त्याचाच पुनरूच्चार केल होता.
बाळासाहेब-" माझे हृदय तुमच्यापाशी आहे "असे शब्द उच्चारताच सभेला जमलेल्या तमाम     शिवसैनिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र...देशातील नव्हे जगभरातील तमाम मराठी माणसाच्या हृदयांतील हे दैवत यापुढेही असेच अढळ रहाणार आहे.
Balasaheb thakre (New Article 2019)


अन्याया विरुद्ध फटकारणारा कुंचला...लख-लखत्या तलवारीच्या धारी समान भासणारी लेखणी आणि ठाकरी शैलीत लाखोंचा जन सागराला मंत्रमुग्ध करण्याची कला असलेले जातिवंत कलाप्रेमी,तमाम शिवसैनिकांच दैवत असलेले शिवसेनाप्रमुख,हिंदूहृदयसम्राट," स्व.बाळासाहेब ठाकरे "17 नोव्हेंबर 2012 रोजी अनंतात विलीन झाले.आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा  शिवसेनाप्रमुख,स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!    https://konkanbeauty8.blogspot.com                #Balasaheb thakre #hinduhrudaysamrath # shivsena # Yuvasena #marmik #samna #samna newspaper # shivtirth #shivaji park #shivsaynic #shivsena bhavn #Balasaheb #dopehrka samna #fans of balasaheb #fans of shivsena #sanyuqta maharshtra chalval #new artical 2019 #konkanbeauty8 #new blog 2019 #Balasaheb thakre EK Ugapurush #article 2019

Wednesday, November 13, 2019

Global warming


  1.  https://konkanbeauty8.blogspot.com        🔴 " GLOBAL WARMING "  🔴                            #A global erosion problem          Hello friends ...Today we are going to know about a world-wide truth that is increasing day by day.There are many international scientists as well as social organizations and research organizations like NASA working on GLOBAL WARMING topic. Therefore, we should all contribute to this social mission.

GLOBAL WARMING
Humans themselves are responsible for the global warming and the immense loss of nature. Because of the ever-expanding tree-littering buildings, tovers, chemical projects, the climate has changed dramatically over the past hundred years.Due to the increase in temperature, natural calamities like extreme rain and floods are increasing day by day. According to NASA'S report last year 2018 was recorded as the hottest year.
GLOBAL WARMING
Due to the temperature rise, the snowfall and glacier melt in the world are increasing. Also, fast-growing cities, long-lived bridges, unnecessary dams, unauthorized constructions have been added in the name of development in the sea. As a result of the traditional flow of water, the water is being treated as a tension during the tide of the sea. Leaving it results in many regions Fishing is the business.
GLOBAL WARMING
Due to #global warming, the economic rate of the agricultural sector has declined. fiance,okhi & kyarr cyclone created by the sea have forced the peasantry. Global warming is taking a hot look day by day for rapid growth.#toxic hazardous gases like #carbon dayoxaid, #sulfer in the atmosphere.  Everyone should think deeply about it The use of additional vehicles should be carried out by public transport at a minimum. Which will contribute to some reduction in #air pollution.
GLOBAL WARMING
Air pollution from the air is increasing the amount of Due to global warming, devastating storms like. The number of trees decreasing day by day due to deforestation.In the development of cities, the nature of nature will not deteriorate.This feeling has to be given to every person in the world And should work.
Methane (greenhouse gas) from organic matter decomposition also causes global warming. Similarly, domestic commercial ACs and CFCs(Carbon+Chlorine+Fluorine)out of the fridge.
GLOBAL WARMING
All these gases absorb heat from the sun's rays. As a result, the temperature of the earth rises faster.  The ozone layer is nature's protective shield for life on Earth. The ozone layer works to stop the sun's radiation from falling. But #global warming is also slowing it down.
Concerned unnecessary  construction under the name of progress should be curbed by the rulers of that country. Similarly, focus should be on the proper dissolution of toxic gases from the Odyogic Project and the chemical ash that comes out of the project.Extremely harmful projects should be banned without any politics.
Due to #global warming, the death toll of animals is increasing rapidly. Many species are on the verge of extinction today.
GLOBAL WARMING
If we keep the balance of this creation, this nature will also be rich if we keep the balance of the planet.  Be sure to do new constructions, but the balance of nature must be maintained as well. If the temperature remains calm then the living beings here are going to be happy.                                                        My only motive behind writing this article is that if we create and save this beautiful nature ... then we are all going to live earthly. Therefore, from today, we will see the benefits of this beautiful nature.                        #KONKAN BEAUTY #ems #us #pollution #climate change #green #environment science #environment health #environment problems #environment #epa pollution

Sunday, November 10, 2019

THE DANU (PART 2)


  • #Konkan Beauty #Short story#Article #Blog#New Blog#New Article #KONKAN BEAUTY                                    # THE DANU (PART 2)
THE DANU (PART 2)
#THE DANU

As the days progressed,the belief in the concept of the God of Danu was erupting. He used to look at these lifeless photographs of images called God.But since this morning #Danu is feeling more awkward than usual. Danu, who was worshiped by routine, was lost in a different mystery today. Danu had been out of school for eight years.Whenever you look back, the body collects happiness and sadness within miles of failure Unsteady...The condition seems unbearable...and the mind is depressed. To this day, I had never seen Danu in such a state.After seeing that incarnation, there was a huge period in my heart.The raging sea waves also float for a moment or so. It seems as if Dandu himself was buzzing in the distance."People like us used to live with a fake smile...why? For the false reputation of this practicing world ... for false men...Was waiting for death to die one day, making the Taj Mahal a day of glory. To never return to this ghost here...and Suddenly the chatter stops and he starts talking to himself again. "Until now, there was no one else besides Danu, the memory of my mother and father. This time, however, he had moved on and wasted his old thoughts on vain memories.O you who are weak, so far as you have called me and you are not the same people today.  Will give After that, these same men will never look back to say that the world is not yours.And your imaginary world will be very witty at some angle. Dandu started to talk to himself."Hey, my uneducated but hard working father forced these people into trouble.  Nelly. Day without night, helped.The men reached Rab-Ra in their fields today.The above does not give my father a simple introduction to this monster, which means straightforward ... for those of us who have become worthless insects littering this earth... only insects"... The oncoming crowd looks at Danu with suspicious eyes. Danu looks at them as well.The men look at him with a big smile, but tears come out of his eyes immediately. Anywhere, he raises his hand with joy, wiping tears with his other hand.But those men of the past had nothing to do with it. Because they had lost their self-interest. Not just these men, but the man who was dressed in man's clothes, Danu had easily forgotten his father. He had no one to deal with.Let's call this kind of affection anonymous affection.  There are truths and superiority in the world of. If you join this demon in your happiest moments in the pursuit of your success...? Never did you have friendship with him...If you listen to him even four words...? The dream is to come to life as it was. He seems to be obsessed with his eyes. You have to succeed in this world.And happily, it would be like a scorching spring of water. If that were the case...then this Danu demon continued to do something for others. And he could not find two happy moments in this cycle. He had an evil dream that he wanted to succeed like you.But it remains the dream. Danu suddenly wakes up and says,"Oh, this monster can succeed too ... Poor father's poor mother."What happened as a child...that Danu succeeded"... Danu's words were out of his control. He became angry and burst into something in his mouth.The fever flashed. His words and body rhythms were missed. Dada's voice was heard slowly.It happened.He used to tell us that "I wanted to be as successful as you are in the real world of your success" ... The storm was beginning to rain with lightning.There was no one left to help in the dark.His companion had great peace.Silence was heard in the direction of the crematorium at that distance, and suddenly Danu's chest rose and Danu cried out once more as "My ............... SS" he fell into the mud covered with rain................. Danu had taken the message of this world. Keep all your friends alive.....be successful..... you give yourself hope, away from this friend.Why?........Why?????                   #Written by Prasad Logade
THE DANU (PART 2)
 #The Danu

  •  #THE DANU (PART 2) #Short story #Article #Blog #New Blog #New Article #SEO #WI-FI #KONKAN BEAUTY #Danu #Story 2019 #short story 2019 #best story 2019 

THE DANU ( PART ONE )

# KONKAN BEAUTY #short story # New article # Blog                                        # "THE DANU" (Part One)            #Writeen by PRASAD LOGADE   
Konkan Beauty
#THE DANU
An event in one's life that will last the entire life of a person.  Turning can be either comforting or hurtful to you or the person in front.  Looking from one end of it, the front appears to be dense, and even if you look at it on the other side, it remains the same.  That is why we have to think about how to be happier in our daily lives, without thinking about what will happen in the future.  So some things become so united on the mind that even if you try to forget it, it becomes inactive.  The friend's name is Dinesh but he did not even know when Dinesh's 'Danu' became the same name after changing it to a mostly rural population.  Born in a small village ... in a poor family, his home situation was as dire as ever. Danu's father used to smoke in the houses of his mother and mother, and the world was in a difficult state.  Danu's progress in school was also good.  All the teachers in the school Danu had become a pampered student.  Conversation ... painting ... sports ... In studies he was more genteel than any of the other smart kids in the class.  No one was able to stop Danu's clever chariot. But suddenly a storm destroyed Danu's dreams. One day Danu's father removed Danu from school. The headmaster of the school ... teachers ...  No one was beyond comprehension. There was great silence in the school yard.  The heart-wrenching cry was going out of the school yard. The fun-filled congregation was gathered on the road next to the school. Seeing the crowd, Danu's father grinned horribly.
The danu
#The danu 
Shivi used to laugh and drink water from the ground.  His mother came. Throwing the washcloth on the head, the three of them ran towards Danu. As soon as he arrived, Danu raised both hands towards him and he swallowed her tightly as "Mother".  It was a different turning point in life. The golden dreams of education had ceased to exist.  Vatatatajasi you see a piece of a T V series and is also just sounded too jatoya forget to Pharaoh in two days.  Looking at the night and forgetting it in the morning, it was just a matter of saying that Danu had a lucid dream. In this world of practice, he grew up on the strength of study.  Like a bungalow of leaves, it hit the ground momentarily  He was ready to work as much as he could. He was stunned by the sudden storm. The situation might have seemed destructive, but it was not. The crisis is such a terrible pain that it falls on someone else's back.  He was completely self-confident even though he had turned his back on me  If you could feel slightly FIGS.  I was surprised that a man could laugh at such an event. He has never been shaken by the pain. He is struggling with that cruel destiny today.  Because he wants to achieve that lost epitaph.  The same lost dream is coming true. But Danu does not recover from failure. One day a man in the court arrives with a farm land confiscation paper. Danu's father loudly calls out "Honeymaya you got a notice of the farm land confiscation.  The hut comes out.  In both of Mouli's eyes, the clouds of Janu Shravana began to thicken. Dandu was also watching everyone.  So, the sun's rays coming from the east were glowing in the eye. The man goes away and suddenly hears a hanma savitri there and starts to cry and tosses the soil of the field and weeps.                                                   Takes  In the desert, the dogs start screaming. In the middle of the desert, the wool now starts to fill in the gaps.  Lightning ... the strong wind ... and the rain started to rain ...
 #short story #New Story#blog               (in the next section)

 

Saturday, October 26, 2019

Happy Diwali 2019

HAPPY DIWALI 2019
#HAPPY DIWALI 2019
Diwali is the biggest of all Hindu festivals.Deepawali is a combination of two words, deep meaning "light" and avail "a row" to develop into "a row of lights."                                                           " Diwali " is a four day celebration of the festival, which accurately lights the nation with its brilliance and dazzles peoples with its delight.                  #Happy Diwali #Diwali History, #Deepavali Images, #Happy Deepavali
HAPPY DIWALI 2019
# HAPPY DIWALI 2019
  •                      🌟 दिपावली 🌟                            दिवाळी भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध सणांमधील एक आहे.हिंदू धर्मात दिवाळी विशेष महत्व आहे.दिवाळी सण साजरा करायच मुख्य कारण कि या दिवशी प्रभु श्रीराम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण सह 14 वर्षाचा खडतर वनवास भोगुन अयोध्येमधे परत आले होते.त्यावेळी त्यांनी महामायावी रावणाचा वध केला.त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने तेलाच्या पणत्या पेटवून प्रकाशशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.       दिवाळीला हिंदू बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात.बाजारामध्ये लहान मुलं कपडे,खेळणी, फटाके,मिठाई विकत घेतात.स्त्रिया व पुरूष मंडळी पारंपारिक पध्दतीने दिवाळीच्या मुहूर्तावर सराफाकडे जाऊन सोने खरेदी करतात.तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू अथवा सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.दिवाळीला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे आकर्षक तोरण मुख्य द्वारावर लावले जाते.अंगणात प्रवेश द्वारासमोर वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळया काढल्या जातात. रांगोळीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे आणि ती शुभकारक मानली जाते.अंगणातल्या एका बाजूला लहान मुले एखाद्या किल्याची प्रतिकृती माती आणि दगडांच्या साहाय्याने उभी करतात त्यानंतर तो किल्ला रंगवून त्यावर छत्रपती शिवरायांचे प्रतिकात्मक मावळयांचे छोटे पुतळे आणि सर्वांत वरती छत्रपती शिवरायांचा सिहांसनावर बसलेला पुतळा बसविला जातो.दिवाळीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे आणि त्यांच्या किल्याचे स्मरण केले जाते.नव्या पिढीला आपल्या पुर्वज्यांच्या ईतिहास आणि पराक्रमाची ओळख होते.               🌟दिवाळीत क्रमाने येेेणारे सण आणि त्यांचे महत्व.                                          🔹वसुबारस🔹                                                  आश्विन कृष्ण द्वादशीस हा वसुबारस सण साजरा केेला जातो.आपला देश कृृृषीप्रधान असल्याने 

येथील शेतकरी वर्ग आपल्या जवळील बैल,गाय आणि वासरांना स्वछ करतो.त्यांना या दिवशी हळद-कुंकू अक्षता आणि फुलांची माळ त्यांना घालून निरांजनाने ओवाळणी केली जाते.त्यांच्यासाठी खास या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून तो केळीच्या पानावर ठेवून गाई वासरास खावयास दिला जातो.              🔸नरक चतुर्दशी🔸                                              या दिवशी भगवंत " श्रीकृष्णाने " नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या अन्यायापासुन मुक्त केले.श्रीकृष्णाच्या या पराक्रमाची आठवण म्हणुन आश्विन कृष्ण चतुर्दशीस " नरक चतुर्दशी " हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतवर्षात या दिवशी अभ्यंगस्नानाची प्राचीन परंपरा आहे.पहाटे उठून संपूर्ण शरीराला नारळाच्या रसापासुन काढण्यात आलेेले तेेेल व सुुुवासिक उटणे लावून सुर्य उगवण्या आधी केेेलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नानं. त्यानंतर सर्व कुटुंबा समवेत करंजी,लाडू,शंकरपाळे,चिवडा,आदी विविध प्रकारचा गोड फराळ करतात. सायंकाळी देवी लक्ष्मी मातेचे पुजन विधिवत केले जाते. व्यापारी व व्यावसायीक वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष म्हणजेच        ( विक्रमसंवत ) खरया अर्थाने लक्ष्मी पूजनानंतर सुरु होते.                                                                    🔹 दिवाळी पाडवा 🔹                                         नरक चतुर्दशीचा पुढील दिवस कातिॅक शुध्द प्रतिपदा   ( बलीप्रतिपदा ) म्हणुन साजरा केला जातो. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणुन देखील ओळखले जाते. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणुन या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिनी बळी राजाचे प्रतिकात्मक रांगोळीने चित्र काढतात व त्याची विधिवत पुजा करतात. " ईडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो "असे म्हटले जाते. वर्षभर शेतात परीश्रम करत असलेल्या बैलांना स्वछ करून रंग लावून व माळ घालून सजवतात.त्यांना गोड पदार्थ करून खावू घातले जातात.                                                                 🔸भाऊबीज🔸                                                  दिवाळी पाडवा पुढील दिवस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ-बहिणींचा स्नेह वृध्दींगत करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो.बहिण भावाला ओवाळते.भाऊ तिला ओवाळणी  म्हणुन एखादी स्नेह भेट ओवाळणीत टाकतो.   #Happy Diwali #Diwali History,#Deepavali Images, #Happy #KONKAN BEAUTY # INDIAYA WALI DIWALI
HAPPY DIWALI 2019
# HAPPY DIWALI 2019
https://konkanbeauty.blogspot.com

Wednesday, October 23, 2019

EK HOTA DANU ( PART 2 )

EK HOTA DANU  (PART 2)
# EK HOTA DANU  (PART 2)
#Konkan Beauty  #Short story               https://konkanbeauty8.blogspot.com    EK HOTA DANU (PART 2)                                  जसे दिवस पुढे-पुढे सरकत होते तसा दानूचा ईश्वर या संकल्पनेवरचा विश्वासच उडत चालला होता. देव नावाच्या प्रतिमांना या कागदी निर्जिव फोटोंना तो पाठीराखा मानत होता.पण आज सकाळ पासून दानू नेहमीपेक्षा अस्वस्थ वाटतो आहे.नित्य नेमाने देवाची पूजा करणारा दानू आज कोणत्यातरी वेगळ्या गुढ विश्वात हरवला होता.दानूला शाळा सोडून आठ एक वर्षे उलटली होती.दानूच्या पुढे निघुन गेलेले मित्र जेव्हा कधी मागे वळुन पहातात तेव्हा तो अपयशाच्या मैलाशी मनात सुख दुःखाची गोळाबेरीज करताना शरीरांन हतबल...परीस्थितीने बेजार...आणि मनांन निराश झालेला दिसतोय.आजपर्यंत मी दानूला अशा अवस्थेत कधीच पाहिला नव्हता.तरीही त्या खडतर परीस्थितीत तो उदरनिर्वाहाची केवीलवाणी धडपड करत होता.चातका प्रमाणे सुखाच्या एका कवडशाची डोळ्यात प्राण आणून वाट पहातोय.त्याच्या डोळयातले अश्रू सुकून गोठलेत.त्याचा तो अवतार पाहुन माझ्या अंतःकरणात प्रचंड  कालवाकालव झाली.दानूच्या या अवस्थेकडे पाहुन स्वैर खळखळत्या सागराच्या लाटा देखील क्षणभर वहाताना स्थिर होतात की काय असा भास निर्माण होतो.दानू दूर कुठेतरी पहात स्वतःशिच बडबडत होता." आमच्या सारख्या लोकांनी खोटं हसू जपत जगायचं असतं...का ?तर या व्यवहारी दुनियेच्या खोटया प्रतिष्ठेसाठी...खोटया माणसांसाठी...मृत्यूची वाट पहात जीर्ण झालेल्या स्वप्नांचे ताजमहाल बनवत एक-एक दिवसांनी मरायचं असतं.इथे या भुतलावर कधीही परत न येण्यासाठी...आणि अचानक बडबडताना थांबतो.आणि पुन्हा स्वतःशीच बोलुन लागतो."आजपर्यंत दानूच्या हक्काच मायं आणि बापाच्या आठवणी शिवाय तीसरा कुणीच नव्हता.हा काळ मात्र केव्हाच पुढे सरकला देखील आणि त्या जुन्या होऊन धुळ खात बसलेल्या आठवणींवर निरर्थक विचार करत बसलाय.हि दुनिया तुला वेडा समजतील कारण तू दुर्बल आहेस.अरे जे लोक ज्यांना आजपर्यंत तू माझे-माझे म्हणत आलास नां तीच लोक आज या घडीला तूला आधार देखील नाही देणार. त्या नंतर हिच माणसं हे जग तुझ नाही दानू सांगायला मागे पुढे देखील पाहणार नाहीत.आणि तुझ्या कल्पनेतल जग कोणत्यातरी कोनात असलच तर अतिशय विद्रूप असेल.दानू स्वतःशीच बोलू लागला."अरे ज्या माझ्या अशिक्षीत पण कष्टाळू बापानं या लोकांना अडचणीच्या वेळी मोलमजुरी करुन त्यांची वेळ मारून नेली.दिवस रात्रीचा विचार न करता मदत केली.त्यांच्या शेतात राब-राबला ती माणसं आज यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर माझ्या बापाला या दानूला साधी ओळख दाखवू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे...आम्ही झालो आहोत त्यांच्यासाठी या पृथ्वीवर रेंगाळणारे निरूपयोगी किडे...फक्त किडे"...येणारी जाणारी गर्दी दानूकडे संशयी नजरेने पाहतेय.दानूही त्यांच्याकडे पहातो.                                                              ती माणसं मोठ मोठयाने हसू लागतात त्याच्याकडे बघुन,पण त्याच्या डोळ्यांतुन अश्रू येतात झटकन.तरीही तो ते आनंदाचे सांगुन एक हात उंचावून,दुसरया हाताने अश्रू पुसतो पटकन.                                                    पण त्या उलट्या काळजाच्या माणसांना काहीच नसतं.कारण त्यांचा स्वार्थ साधुन झालेला होता.यशाच्या आनंदात ही माणसं नव्हे तर माणसाच्या वेषात वावणारी जनावर दानूला त्याच्या वडिलांना किती सहज विसरून गेली आहेत.कारण व्यवहाराने तो कुणाचा कुणीच नव्हता.पण काही नाती अशी असतात की त्यांना ठेवण्यासाठी नावच नसतात.अशा स्नेहाच्या नात्यांना आपण अनामिक स्नेहबंध म्हणुया.पण अशी काही नाती या असत्याच्या जगात सत्य आणि श्रेष्ठ असतात.तुमच्या यशाच्या वाटचालीत एखाद्या आनंदाच्या क्षणी या दानूला आपल्यात सामील करून घेता तर...?कधी नाही केली मैत्री तुम्ही त्याच्याशी...चार शब्द त्याचेही ऐकुन घेता तर...?तुम्हाला नाही वाटत या कथेतील दानूची हरवलेली स्वप्न जशीच्या तशी वास्तवात यावीत.त्यालाही मनोमन वाटतयं ते त्याच्या डोळ्यात दिसतंय.आपणही या दुनियेत यशस्वी होऊन दाखवावे.आणि मग ताठ मानेने आणि आनंदाने मनभरून एखाद्या खळखळणारया झरयासारख हसावं.खरंच असं घडले असतं तर...?हा भोळा दानू इतरांसाठी काही ना काही करत राहीला.आणि त्याला या कालचक्रात दोन सुखाचे क्षण सापडू नयेत.दानूचं एक ईवलस स्वप्न होतं कि त्यालाही तुमच्या आमच्यासारख यशस्वी व्हायचं होतं.पण हे त्याच स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं.दानू अचानक झोपेतून जागा झाला आणि "अरे हा दानू देखील यशस्वी होऊ शकतो...गरीब बापाचा गरीब मुलगा असलो म्हणून काय झालं...हा दानू यशस्वी होणारचं "...दानूचा हे बोलताना स्वतःवरचा ताबा सुटला होता.बेफाम होऊन तो काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता.ज्वराने अंग फणफणत होते.त्याचे शब्द आणि शरीराचा ताळमेळ चुकला होता.दानुचा आवाज हळूहळू ऐकु येईनासा झाला. तो तुम्हाला आम्हाला हे सांगण्यासाठी कि " मला देखील या तुमच्या यशाच्या वास्तव जगात तुमच्या प्रमाणे यशवंत व्हायचं होतं " चहोबाजूंनी आभाळ भरून आलं होतं...विजांसह वादळी पाऊस सुरू झाला होता. काळ्याकुटट अंधारात आधारासाठी कुणीच उरलं नव्हतं.त्याच्या सोबतीला होती भयाण शांतता. त्या शांततेला चिरत दुरवर स्मशानच्या दिशेला भेसुर कोल्ह्यानंच किंकाळीने ऐकू येत होतं.अचानक दानुच्या छातीत कळ उठली आणि दानू एकदाच मोठ्याने ओरडला " मायं............... SS " म्हणून तो पावसाने लालबुंद झालेल्या मातीच्या चिखलात कोसळला.................दानुनं या जगाचा निरोप घेतला होता.सर्व मित्रांना किर्तीवंत व्हा...यशवंत व्हा...असा आशावाद देणारा तू स्वतःच या मित्राला सोडून दूर-दूर नि...घा...ला...स...का दानू ? का ?            #Written by Prasad Logade 

Monday, October 14, 2019

EK HOTA DANU (PART ONE)

#short story#New article#Blog                        " Ek hota Danu " (Part One) 
EK HOTA DANU (PART ONE)
#EK HOTA DANU (PART ONE) 
        एखाद्याच्या जीवनातला असा एखादा प्रसंग ज्यानं त्या व्यक्तीच सबंध आयुष्यच पलटून जाईल.जरा वेगळ्या अर्थात सांगायचं झालं तर आपण त्याला मातृभाषेत अचानक व्यवहारी कामकाजाला अधभुत कलाटणी देणारं वळण म्हणुया.एखादवेळी हे वळण आपल्याला किंवा समोरील व्यक्तीस सुखकारक अथवा दु:खकारकही असु शकते.तर अस हे अनाकलनीय आयुष्याचा वळण. त्याच्या एका टोकाकडुन पाहिले तर समोर गर्द दाट धुकं पसरलेलं दिसतंय तर अगदी दुसरीकडे पाहिलं तरीदेखील तीच स्थिती. म्हणूनच आपण पुढे भविष्यात काय घडणार याचा विचार न करता आपल्या दैनंदिन जिवनामध्ये अधिकाधिक आनंदी कसे रहाता येईल याचा कुठेतरी विचार करायला हवा.जिवनाच्या रहाटगाडग्यात असे काही सोनेरी दिवस...क्षण...असे काही निघून जातात की त्या भुतकाळतल्या आठवणी आपल्याला आठवत देखील नाहीत. तर काही गोष्टी मनाच्या पटलावर ईतक्या एकरुप होतात की त्या विसरायचा कितीजरी प्रयत्न केला तरी तो निष्क्रीय ठरतो.                                  तर आपण आयुष्यात अचानक आलेल्या वळणा विषयी बोलत होतो.माझ्या एका मित्राच्या बाबतीत असंच काहीसं घडल आणि ती गोष्ट मी आपल्याला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या मित्राच नाव आहे दिनेश पण ग्रामीण बहुतांशी अशिक्षीत वस्तीत राहुन त्याच नाव बदलत जावुन दिनेशचा 'दानू' केव्हा झाला हे त्याला देखील कळलं नाही. एका छोट्याशा खेड्यात...एका गरीब कुटुंबात जन्म झाला त्याचा.त्याची घरची परिस्थिती तशी हलाकीची होती.दानूचे वडील मोलमजुरी आणि आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कसेबसे संसाराचा अवघड गाढा रेटत होते.अशातच दानू गावच्या शाळेत शिकत होता. दानूची शाळेतील प्रगतीही चांगली होती. दानू शाळेतील सर्व शिक्षकांनचा लाडका विद्यार्थी झाला होता. संभाषण...चित्रकला...क्रीडा...अभ्यासात तो वर्गातील ईतर हुशार मुलांपेक्षा काकणभर सरस होता. दानूचा हा हुशारीचा रथ कुणीच रोखू शकत नव्हता.पण अचानक एका वादळानं दानूच्या सप्नांना भुईसपाट केलं.एके दिवशी दानूच्या वडिलांनी दानूला शाळेतून काढला.शाळेतील मुख्याध्यापक...शिक्षकांनी...एवढंच काय तर दानूच्या वर्गातील मुलांनी अश्रू ढाळत समजावले.पण त्या क्षणाला दानूचे वडील कुणाच ऐकण्या समजण्या पलीकडे गेले होते.शाळेच्या आवारात भयाण शांतता पसरली होती.मात्र त्या शांततेला चिरत दानूच्या हृदय पिळवटुन टाकणारं रडणं शाळेच्या आवारा बाहेर जात होत.शाळेला लागूनच असलेल्या रस्त्यावर मजा बघणारी मंडळी जमा झाली होती.ती गर्दी बघून दानूचा बाप भयंकर पिसाटला.त्याने दानूच्या गळ्याजवळ शर्ट पकडला आणि लालभडक धुरळयातून तसाच फरफटत त्याला झोपडीपाशी आणलं आणि आत ढकलून दिलं.एक गावरान शिवी हासडून मातीच्या लोटयातल पाणी गटागटा पिवू लागला.ईतक्या नदिवर धुणं धुण्यासाठी गेलेली दानूची आई आली.डोक्यावरची धुण्याची फाठी अंगणात टाकत तीनं दानूकडे धाव घेतली.ती येताना पहाताच दानूने दोन्ही हात तिच्या दिशेने उंचावले आणि त्याने तिला " मायं " म्हणुन घट्ट बिलगला.त्याची आई देखील त्याला काही प्रश्न नविचारता धाय मोकळुन रडू लागली.हाच तो क्षण ज्याने दानूच्या आयुष्याला एक वेगळ वळून दिलं.त्या शिक्षणाच्या सोनेरी स्वप्नांच्या वाटा बंद झाल्या होत्या.हि स्वप्नही काही वेळा बरी वाटतात.जशी आपण एखाद्या टि व्ही मालिकेतील एखादा भाग पहातो आणि दोन दिवसात विसरून देखील जातो.या स्वप्नांच देखील अगदी असंच आहे. रात्री पहावित आणि सकाळी विसरून जावित.हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की दानूचंही एक निरागस स्वप्न होतं.या व्यवहारी जगात अभ्यासाच्या ताकतीवर खुप-खुप मोठ व्हायचं.भविष्यात एखादी चांगल्या पगाराची नोकरी मिळवून मायं वडिलां सोबत आपल्या नव्या घरात सुखात रहायचं.पण वडिलांच्या निर्णयामुळे दानूच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात जमिनीवर येवून आदळले.मोठ होण्यासाठी लागतील तितके श्रम करायला तयार होता तो.या आकस्मिक आलेल्या वादळाने पुरता भांबावलेला होता.परिस्थिती समोर गुढगे टेकेल असं नियतीला देखील वाटलं असेल.पण तसं अजिबात नव्हते.संकट ही अशी भयंकर पीडा आहे कि ती एखाद्याच्या पाठी लागली कि ती पुरेपूर लागते.दानूच्या नशिबाने त्याच्याकडे पुर्णपणे पाठ फिरवली असली तरी त्याचा स्वताःवर विश्वास होता.पण मला त्याच्याकडे पाहून त्याच्या बाबतीत अस काही घडलं असेल अस किंचितही वाटत नव्हते. अशा प्रसंगात माणूस हसू शकतो याच गोष्टींचं मला आश्चर्य वाटत होते.या पेचात तो किंचित देखील तसुभर डगमगला नाही.आज तो त्या क्रुर नियतीशी झुंज देतोय.का माहिती आहे ? कारण त्याला ते गमावलेले ईप्सित साध्य करायचंय. त्याच हरवलेले स्वप्न सत्यात उतरायचंय.पण दानू अपयशातून सावरतो ना सावरतो एके दिवशी कोर्टातला एक माणूस शेतजमिन जप्तीचे कागद घेऊन आला.दानूच्या वडिलांना जोरानं हाक मारतो " हणम्या तुला कोर्टाकडून शेतजमिन जप्तीची नोटीस आलीय लवकर ये "हणम्या गोठयातून तोंड पाडून त्याच्या समोर उभा राहतो.दानूची माय झोपडी बाहेर येते.तीनं कमरेला खोचलेला पदर तोंडावर गच्च धरला. त्या माउलीच्या दोन्ही डोळ्यात जणु श्रावणातले ढग दाटुन आले.दानू देखील सर्वांना स्तब्ध होउन पहात होता.तो माणूस आणि हणम्या झोपडीपासुन एक फरलांग भर अंतरावर जावून बोलत होते.त्या दोघांचा आवाज या माय लेकरांना येत नव्हता. त्यामुळे दानूच्या मायंची घालमेल होत होती.पुर्वेकडुन येणारी सुर्य किरण डोळ्यात झोंबत होती.                    तो माणूस निघून जातो आणि अचानक हणम्या सावित्री म्हणुन तिथंच मटकन बसतो आणि टाहो फोडून शेतातील माती अंगभर लावून रडू लागतो.मायं आणि दानू विजेच्या वेगाने जावुन हणम्याला बिलगतात.तिघेही धाय मोकळुन रडु लागतात. त्यांना बघून गोठयातली जनावर हंबरू लागतात.पलिकडच्या रानात कुत्री भेसुर ओरडू लागतात.क्षणार्धात आता- आता असलेले ऊन नाहीसं होउन आभाळ ढंगांनी भरून आलं.दुरवर कुठेतरी विजांचा गडगडाट कानी येतो.हणम्या स्वतःला बायको पोराला सावरत उठतो आणि तिघही झोपडीत जातात.झोपडीत दार बंद होताच. विजा...सोसाट्याचा वारा...आणि पाऊसाच जणु तांडव चालू होतं...
#short story #New Story "Latest 
https://konkanbeauty8.blogspot.com          ( पुढील भागात ) #KONKAN BEAUTY
EK HOTA DANU (PART ONE)
# EK HOTA DANU (PART ONE)

Feature post

TANHAJI (The unsung warrior) 2020

✒Article by Prasad Logade    https://konkanbeauty8.blogspot.com 🔵TANHAJI (THE UNSUNG WARRIOR) Upcoming 2020 Bollywood blokbuster fil...