मुलापेक्षा एका जातीवंत " कलावंताची " होणारी घुसमट प्रबोधनकारांनी बाळासाहेबांच्या देहबोलीवरून ओळखली होती.शेवटी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनपर आशिर्वादाने व्यंगचित्राची धार असलेलं स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा बाळासाहेबांनी निर्णय घेतला. ऑगस्ट 1960 मध्ये #" मार्मिक " हे साप्ताहिक सुरु केले." मार्मिक " च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन #मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.भांबावलेल्या मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी तसेच प्रस्थापित राजकीय उणीवांची भांडाफोड करून व्यंगचित्राच्या माध्यमातून सामान्य मराठी माणसा पर्यंत मांडण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. मुंबईत जागोजागी रोजगारासाठी होणारी मराठी माणसाची कुचंबणा...जागोजागी होणारा अपमान...अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याची महत्वाची भूमिका "मार्मिक" च्या माध्यमातून बाळासाहेबांनी बजावली.मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा ध्यास आणि मराठी माणसावर अन्याय करणारया शक्तींना प्रथम बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्याच्या गडद फटकारयातून सरळ केले.मार्मिकच्या अंकातील व्यंगचित्रे पाहून प्रस्थापित त्यावेळच्या राजकारणी वर्गातील कित्येकांना घाम सुटत असे. 🔴जन्म " शिवसेना " नावाच्या मराठी वादळाचा. केवळ व्यंगचित्राने मराठी माणसावर होणारया अन्यायाचं सावट बाजूला होणार नाही, हे बाळासाहेबांनी जाणले होते.यासाठी जाती-पाती मध्ये विखुरलेल्या मराठी माणसाने संघटीत व्हायला हवे.हा विचार बाळासाहेबांना स्वस्त बसु देत नव्हता.एकदिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला " बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही ? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी ? बाळासाहेब बोलले " विचार तर चालू आहे. पण
🔴" सामना " मराठी माणसाच्या मनाचे प्रतिबिंब.
बाळासाहेबांच्या कुंचल्या बरोबर त्यांची लेखणी देखील एखाद्या धार-धार तलवारी प्रमाणे तळपत असे.वडील प्रबोधनकार ठाकरे# प्रल्हाद केशव अत्रे यांचा जबरदस्त प्रभाव बाळासाहेबांच्या लेखणीतून प्रकर्षाने दिसून येत असे. व्यंगचित्रकार आणि संपादकीय अग्रलेख या त्यांच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.संघटना वाढू लागली तशी लोकांच्या समस्यां समजावून घेवून त्यावर त्वरीत शिवसेनाप्रमुखांच्या एका आदेशानुसार होऊ लागली.
" मातोश्रीं "वर आणि शिवसेना शाखांमध्ये सामान्य जनतेचा न्यायासाठी ओढा सतत वाढत होता.त्यासाठी संघटनेचे मुखपत्र हवे होते. जेणेकरून बाळासाहेबांना आपले विचार महाराष्ट्रातील तमाम जनतेपुढे मांडता येवु शकतिल. #23 जानेवारी 1989 रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र असलेले " सामना " सुरु झाले. मुंबई,दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात मोठ्या जल्लोषात शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेबांनच्या शुभहस्ते " सामना "चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेबांचे शब्द हिंदूत्वाचा विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांच्या दररोज होणारया आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी #" सामना " हे नवे ब्रम्हास्त्र होते.आणि एका अर्थाने बाळासाहेबांनी या शस्त्राचा वापर आपल्या संघटनेसाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या भल्यासाठी तसेच अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी केला.याच प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाळासाहेब म्हणाले होते. " सामना " हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे.त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारावी.हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.कारण तो फुटला तर त्याचे तुकडे पडतिल आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रुप दिसेल.आमच्या वृत्तपत्राची भाषा जहाल असेल.तिखट वाटेल,बोचरी असेल.काही वेळा ती असभ्य वाटेल त्यांनी हे वाचतांना विषय समजून घ्यावा.त्या विषयावरील तिडीक व्यक्त करण्यासाठी ती भाषा वापरली जाईल.काहीवेळा जमालगोटाच दयावा लागेल व तो आम्ही देणारच. सामना हा " न्यूजपेपर " आणि " मार्मिक हे "व्ह्यूजपेपर" राहील.आजच्या काळात देखील शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र म्हणुन सामनाची स्वतःची ओळख आहे.आज शिवसेना पक्षप्रमुख आणि "सामना" चे संपादक अशा दोन्ही भूमिका उद्धवजी ठाकरे समर्थपणे पार पाडत आहेत.बाळासाहेबांच्या लेखणीचा आणि निर्भिड विचारांचा प्रभाव असलेले संजयजी राउत हे " सामना "चे कार्यकारी संपादक म्हणुन संपादकीय जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पार पाडीत आहेत.
⭕समाजकार्य एक व्रत
बाळासाहेबांनी झुणका-भाकर केंद्रांची योजना,वृध्दांना आधार म्हणुन वृध्दापकाळातील प्रत्येक क्षेत्रातल्या सवलती,झोपडपट्टीवासियांना घरे,मराठी तरुणांचा नोकरीचा प्रश्न,मुंबईतील उड्डाणपूल,मुंबई पुणे द्रुतगती मार्गांचे कामं,मराठी भाषा...पाटयांचा आग्रह...मराठी साहित्य...चित्रपट...नाट्य कलेला अग्रस्थान,Bombay चे मुंबई स्पेलींग अशी अनेक कामे बाळ बाळासाहेबांनी शिवसेनेचेच्या माध्यमातून केली.बाळासाहेबांच्यात आणि त्यावेळच्या ईतर पक्षातल्या राजकीय पुढारयांमध्ये एक मुळ फरक होता.कि बाळासाहेबांनी राजकारणात कधीही कोणत्याही उमेदवाराची जात पाहिली नाही. त्यांना जाती-पातीचे राजकारण अमान्य होते. " बाळासाहेबांनी "आलेल्या " शिवसैनिकाचे " धाडस पाहिले.महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी आपला एक-एक शिलेदार उभा केला. महाराष्ट्रातील तरूणांच्या सळसळत्या रक्ताचे रूपांतर आपल्या वाणीच्या ताकदीवर त्यांनी महाराष्ट्र प्रेमात केले.बाळासाहेबांच्या शब्दांच्या उर्मीने प्रत्येक माणूस पुन्हा एकदा आपल्या मुलाखत स्वाभिमानाने प्रत्येक क्षेत्रात उभा राहीला.मराठी माणसाच्या स्वप्नांना बाळासाहेबांच्या रूपांन नवे पंख मिळाले.आता हाच भांबावलेला मराठी माणुस आज पाय घट्ट रोवून कोणत्याही वादळाचा सामना करायला उभा ठाकला होता.आता हाच मराठी माणूस नगरपालिका,महानगरपालिका मधून सत्ता पदांवर दिसू लागला होता.सामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकांना " बाळासाहेबांनी " नगरसेवक,आमदार,खासदार,मुख्यमंत्री पदावर बसविले.ही कीमया "बाळासाहेब ठाकरे" नावाच्या वादळी झंझावाताची होती.
🔴मार्मिक ते शिवसेना
बाळासाहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिकांवर नितांत प्रेम केले.त्यांनी "शिवसेना" ही संघटना एखाद्या कुटुंबाप्रमाणं मानली आणि कुटुंबप्रमुख या नात्याने ती जोपासली...वाढवली.प्रवाहा विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि सामान्य मराठी माणसाच्या जोरावर पुन्हा एकदा शिवशाही या महाराष्ट्रात आणुन एक नवा विक्री ईतिहास रचला.एका चळवळीतून संघटना ते सत्तारूढ पक्ष ईथ पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.आता बाळासाहेबांचा " शिवसेना " नावाचा चार अक्षरी मंत्र थेट मंत्रालयापासुन ते थेट राज्यातिल जिल्हा परीषदा,पंचायत समित्या,ग्रामपंचायतां मध्ये गरजू लागला होता.शिवसेना पक्षाच्या गाव तिथे " शाखा " उभ्या राहिल्या.
🔵बाळासाहेब एक दिपस्तंभ
रोखठोक कार्यपद्धतीमुळे " बाळासाहेब "नेहमीच देशाच्या राजकीय वाटचालीत अग्र स्थानी राहिले."शिवसेना" च्या जडणघडणीच्या प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची अनेक वादळे स्वतःच्या अंगावर झेलली पण त्याची झळ कोणत्याही शिवसैनिकाला लागू दिली नाही.
बाळासाहेब-" माझा शिवसैनिक म्हणजे माझं सर्वस्व आहे,त्यांच्याशिवाय माझ्या शिवसेनेच्या कर्तृत्वाचा अध्याय लिहिलाच जावू शकत नाही. असे आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला थेट कुटुंबप्रमुख " शिवसेनाप्रमुखांनी " गौरविले.
🔴शिवतिर्थावरील बाळासाहेबांची अखेरची सभा.
शिवसेनाप्रमुख,हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे - " जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनिंनो आणि मातानों ".....शिवसैनिक हा माझा प्राण आहे.ही माझी संपत्ती आणि उर्जा आहे असे " सांगत लाखो शिवसैनिकांच्या हृदयावर कित्येक दशके अधिराज्य गाजवणारे...विजेप्रमाणे कडाडणारे बाळासाहेब आज थोडेसे हळवे झालेले भासत होते.या असामान्य नेत्याने आपल्या शिवतिर्थावरील अखेरच्या भाषणात देखील त्याचाच पुनरूच्चार केल होता.
बाळासाहेब-" माझे हृदय तुमच्यापाशी आहे "असे शब्द उच्चारताच सभेला जमलेल्या तमाम शिवसैनिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र...देशातील नव्हे जगभरातील तमाम मराठी माणसाच्या हृदयांतील हे दैवत यापुढेही असेच अढळ रहाणार आहे.
अन्याया विरुद्ध फटकारणारा कुंचला...लख-लखत्या तलवारीच्या धारी समान भासणारी लेखणी आणि ठाकरी शैलीत लाखोंचा जन सागराला मंत्रमुग्ध करण्याची कला असलेले जातिवंत कलाप्रेमी,तमाम शिवसैनिकांच दैवत असलेले शिवसेनाप्रमुख,हिंदूहृदयसम्राट," स्व.बाळासाहेब ठाकरे "17 नोव्हेंबर 2012 रोजी अनंतात विलीन झाले.आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख,स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! https://konkanbeauty8.blogspot.com #Balasaheb thakre #hinduhrudaysamrath # shivsena # Yuvasena #marmik #samna #samna newspaper # shivtirth #shivaji park #shivsaynic #shivsena bhavn #Balasaheb #dopehrka samna #fans of balasaheb #fans of shivsena #sanyuqta maharshtra chalval #new artical 2019 #konkanbeauty8 #new blog 2019 #Balasaheb thakre EK Ugapurush #article 2019