https://konkanbeauty8.blogspot.com # FATHER OF THE NATION " महात्मा गांधी " # Mhatma Gandhi #KONKAN BEAUTY # History #Nation # 2 October #15 August 1947
मित्रांनो... 2 ऑक्टोबर भारतीय ईतिहासातल्या महामानवाची म्हणजेच आपले राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची 150 सावी जयंती.बापूंचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर काठियावाड,गुजरात येथे झाला. शालेय शिक्षण संपवून बापू वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे इ.स.1888 मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिवर्सिटी काॅलेज येथे वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते वकील बनले. असहकार आणि अहिंसेच्या तत्वांचा वापर सर्व प्रथम त्यांनी आफ्रिकेतिल भारतीयांना त्यांचे नागरि हक्क मिळवुन देण्यासाठी केला. इ.स.1891 मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले.सामान्य जिवनाचा प्रारंभ करण्यासाठी ते राजकोटला आले.मात्र एका इंग्रज अधिकार्यांच्या विरोधात गेल्याने त्यांना आपली वकील थांबवावी लागली. 1893 मध्ये त्यांनीब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ ( दक्षिण आफ्रिका )येथील दादा अब्दुला आणि कंपनी नावाच्या भारतीय कंपनीतील एका पदासाठी वर्षभरासाठी नियुक्ति झाली. इ.स.1915 मध्ये भारतात परत येताच बापूंनी चंपारणमधील कष्टकरी दुर्बल घटकांसाठीचा लढा उभा केला.शेतकरी वर्गावर लादलेला जुलमी कर व जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना संघटीत केले.बापूंच्या विचारांवर प्रभाव होता ते त्यांचे राजकीय गुरु भारतीय काॅग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखले.भारताचे राजकारण व देशातील अनेक सामाजिक राजकीय संकटांचा खरा परीचय गोखलेंनी बापूंना करून दिला होता.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मृत्यूनंतर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.इ.स.1921मध्ये काॅग्रेस नेतृत्वाची सुत्रे हातात घेतली.इ.स.1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात 250 मैल अंतर असलेल्या दांडी यात्रेच बापूंनी नेतृत्व केलं. इ.स.1939 सप्टेंबर मध्ये तडकाफडकी व्हाईसराॅयने जर्मनी विरूद्ध युध्द पुकारलं.हे बापूंना कळताच बापूंनी आणि काॅग्रेसने सरकारचा राजकीय पाठिंबा काढला.काॅग्रेसने 1942 साली ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली पण सरकारने त्याकडे कानाडोळा करत त्या विरुद्ध काॅग्रेसचेच्या नेत्यांना तुरूंगात डांबले.दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्य लढा अर्धवट टाकून मुस्लिम लीगने ब्रिटनला मदत केली. आणि बापूंच्या विरोधाला न जुमानता.मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची पाकिस्तानची मागणी केली. 1947 मध्ये ब्रिटिशांनी कुटनीती वापरून या हिंदूस्थानच्या भूमीची फाळणी केली.आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले. आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला ज्याची प्रत्येक भारतीय डोळयात प्राण आणुन वाट पहात होता.तो दिवस होता 15 ऑगस्ट इ.स.1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.बापूंनी आयुष्यभर अकरा तत्वांची उपासना केली. अहिंसा...सत्य...अस्तेय...ब्रम्हचर्य...अपरिग्रह...शरीरश्रम...आस्वाद...सर्वत्र भय वर्जन...सर्व धर्म समानता...स्वदेशी...स्पर्श भावना...निर्भयता या तत्वांना महात्मांनी आपल्या आचरणात आणले.बापूंच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय "अहिंसा दिन "म्हणून साजरा केला जातो. सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक...भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेल्या महामानवाच्या देशात आम्ही जन्मलो याचा आम्हां सर्व भारतीयांना अभिमान आहे.
#KONKAN BEAUTY
#India #Satyagrha #Ahinsa #Satya #Swatyantra #2 august #15 August 1947 https://konkanbeauty8.blogspot.com
# FATHER OF THE NATION |
#KONKAN BEAUTY
#India #Satyagrha #Ahinsa #Satya #Swatyantra #2 august #15 August 1947 https://konkanbeauty8.blogspot.com
No comments:
Post a Comment