" रत्नांची नगरी रत्नागिरी " #History#Ratnagiri#City#Blog #KONKAN BEAUTY #Ratnanchi nagri Ratnagiri #Short story #New blog https://konkanbeauty8.blogspot.com
मित्रांनो गप्पांमध्ये रत्नागिरी हा टाॅपीक आला कि सर्व प्रथम सर्वांना आठवतो तो विस्तीर्ण निळाशार अथांग समुद्र...पायांशी हळूवार लगट करणारी पांढरी वाळू. नारळपाणी...हापूस आंबे...फणस...काजूगर...किती-किती म्हणुन जिभेचे लाड पुरवण्याचे थांबे...पण या सर्वांच्या आधी खरी ओळख येते ती रत्नागिरीच्या लालमातीत घडलेल्या लढवय्या त्या क्रांतीसुर्यांची ज्यांच्या बलाढ्य लेखणीनं...वक्तृत्वानं...ब्रिटीशांना सळो का पळो करून सोडल होतं.सारा हिंदूस्थान ज्यांच्या देशप्रेमानं भारावून गेला होता."स्वातंत्र्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारचं" अस इंग्रजांना ठणकाऊन सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक..."ने मजसी ने परत मात्रुभूमीला,सागरा प्राण तळमळला..."अशी मात्रुभूमीला आर्त साद घालणारे...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,"शिका आणि संघटीत व्हा" हा मंत्र देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक थोर मंडळींचा सहवास या भूमिला लागला आहे.त्या पवित्र भूमातेला साष्टांग दंडवत.
#Ratnanchi nagiri Ratnagiri |
# Ratnanchi nagiri Ratnagiri https://konkanbeauty8.blogspot.com |