Showing posts with label लघुकथा. Show all posts
Showing posts with label लघुकथा. Show all posts

Wednesday, October 23, 2019

EK HOTA DANU ( PART 2 )

EK HOTA DANU  (PART 2)
# EK HOTA DANU  (PART 2)
#Konkan Beauty  #Short story               https://konkanbeauty8.blogspot.com    EK HOTA DANU (PART 2)                                  जसे दिवस पुढे-पुढे सरकत होते तसा दानूचा ईश्वर या संकल्पनेवरचा विश्वासच उडत चालला होता. देव नावाच्या प्रतिमांना या कागदी निर्जिव फोटोंना तो पाठीराखा मानत होता.पण आज सकाळ पासून दानू नेहमीपेक्षा अस्वस्थ वाटतो आहे.नित्य नेमाने देवाची पूजा करणारा दानू आज कोणत्यातरी वेगळ्या गुढ विश्वात हरवला होता.दानूला शाळा सोडून आठ एक वर्षे उलटली होती.दानूच्या पुढे निघुन गेलेले मित्र जेव्हा कधी मागे वळुन पहातात तेव्हा तो अपयशाच्या मैलाशी मनात सुख दुःखाची गोळाबेरीज करताना शरीरांन हतबल...परीस्थितीने बेजार...आणि मनांन निराश झालेला दिसतोय.आजपर्यंत मी दानूला अशा अवस्थेत कधीच पाहिला नव्हता.तरीही त्या खडतर परीस्थितीत तो उदरनिर्वाहाची केवीलवाणी धडपड करत होता.चातका प्रमाणे सुखाच्या एका कवडशाची डोळ्यात प्राण आणून वाट पहातोय.त्याच्या डोळयातले अश्रू सुकून गोठलेत.त्याचा तो अवतार पाहुन माझ्या अंतःकरणात प्रचंड  कालवाकालव झाली.दानूच्या या अवस्थेकडे पाहुन स्वैर खळखळत्या सागराच्या लाटा देखील क्षणभर वहाताना स्थिर होतात की काय असा भास निर्माण होतो.दानू दूर कुठेतरी पहात स्वतःशिच बडबडत होता." आमच्या सारख्या लोकांनी खोटं हसू जपत जगायचं असतं...का ?तर या व्यवहारी दुनियेच्या खोटया प्रतिष्ठेसाठी...खोटया माणसांसाठी...मृत्यूची वाट पहात जीर्ण झालेल्या स्वप्नांचे ताजमहाल बनवत एक-एक दिवसांनी मरायचं असतं.इथे या भुतलावर कधीही परत न येण्यासाठी...आणि अचानक बडबडताना थांबतो.आणि पुन्हा स्वतःशीच बोलुन लागतो."आजपर्यंत दानूच्या हक्काच मायं आणि बापाच्या आठवणी शिवाय तीसरा कुणीच नव्हता.हा काळ मात्र केव्हाच पुढे सरकला देखील आणि त्या जुन्या होऊन धुळ खात बसलेल्या आठवणींवर निरर्थक विचार करत बसलाय.हि दुनिया तुला वेडा समजतील कारण तू दुर्बल आहेस.अरे जे लोक ज्यांना आजपर्यंत तू माझे-माझे म्हणत आलास नां तीच लोक आज या घडीला तूला आधार देखील नाही देणार. त्या नंतर हिच माणसं हे जग तुझ नाही दानू सांगायला मागे पुढे देखील पाहणार नाहीत.आणि तुझ्या कल्पनेतल जग कोणत्यातरी कोनात असलच तर अतिशय विद्रूप असेल.दानू स्वतःशीच बोलू लागला."अरे ज्या माझ्या अशिक्षीत पण कष्टाळू बापानं या लोकांना अडचणीच्या वेळी मोलमजुरी करुन त्यांची वेळ मारून नेली.दिवस रात्रीचा विचार न करता मदत केली.त्यांच्या शेतात राब-राबला ती माणसं आज यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर माझ्या बापाला या दानूला साधी ओळख दाखवू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे...आम्ही झालो आहोत त्यांच्यासाठी या पृथ्वीवर रेंगाळणारे निरूपयोगी किडे...फक्त किडे"...येणारी जाणारी गर्दी दानूकडे संशयी नजरेने पाहतेय.दानूही त्यांच्याकडे पहातो.                                                              ती माणसं मोठ मोठयाने हसू लागतात त्याच्याकडे बघुन,पण त्याच्या डोळ्यांतुन अश्रू येतात झटकन.तरीही तो ते आनंदाचे सांगुन एक हात उंचावून,दुसरया हाताने अश्रू पुसतो पटकन.                                                    पण त्या उलट्या काळजाच्या माणसांना काहीच नसतं.कारण त्यांचा स्वार्थ साधुन झालेला होता.यशाच्या आनंदात ही माणसं नव्हे तर माणसाच्या वेषात वावणारी जनावर दानूला त्याच्या वडिलांना किती सहज विसरून गेली आहेत.कारण व्यवहाराने तो कुणाचा कुणीच नव्हता.पण काही नाती अशी असतात की त्यांना ठेवण्यासाठी नावच नसतात.अशा स्नेहाच्या नात्यांना आपण अनामिक स्नेहबंध म्हणुया.पण अशी काही नाती या असत्याच्या जगात सत्य आणि श्रेष्ठ असतात.तुमच्या यशाच्या वाटचालीत एखाद्या आनंदाच्या क्षणी या दानूला आपल्यात सामील करून घेता तर...?कधी नाही केली मैत्री तुम्ही त्याच्याशी...चार शब्द त्याचेही ऐकुन घेता तर...?तुम्हाला नाही वाटत या कथेतील दानूची हरवलेली स्वप्न जशीच्या तशी वास्तवात यावीत.त्यालाही मनोमन वाटतयं ते त्याच्या डोळ्यात दिसतंय.आपणही या दुनियेत यशस्वी होऊन दाखवावे.आणि मग ताठ मानेने आणि आनंदाने मनभरून एखाद्या खळखळणारया झरयासारख हसावं.खरंच असं घडले असतं तर...?हा भोळा दानू इतरांसाठी काही ना काही करत राहीला.आणि त्याला या कालचक्रात दोन सुखाचे क्षण सापडू नयेत.दानूचं एक ईवलस स्वप्न होतं कि त्यालाही तुमच्या आमच्यासारख यशस्वी व्हायचं होतं.पण हे त्याच स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं.दानू अचानक झोपेतून जागा झाला आणि "अरे हा दानू देखील यशस्वी होऊ शकतो...गरीब बापाचा गरीब मुलगा असलो म्हणून काय झालं...हा दानू यशस्वी होणारचं "...दानूचा हे बोलताना स्वतःवरचा ताबा सुटला होता.बेफाम होऊन तो काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता.ज्वराने अंग फणफणत होते.त्याचे शब्द आणि शरीराचा ताळमेळ चुकला होता.दानुचा आवाज हळूहळू ऐकु येईनासा झाला. तो तुम्हाला आम्हाला हे सांगण्यासाठी कि " मला देखील या तुमच्या यशाच्या वास्तव जगात तुमच्या प्रमाणे यशवंत व्हायचं होतं " चहोबाजूंनी आभाळ भरून आलं होतं...विजांसह वादळी पाऊस सुरू झाला होता. काळ्याकुटट अंधारात आधारासाठी कुणीच उरलं नव्हतं.त्याच्या सोबतीला होती भयाण शांतता. त्या शांततेला चिरत दुरवर स्मशानच्या दिशेला भेसुर कोल्ह्यानंच किंकाळीने ऐकू येत होतं.अचानक दानुच्या छातीत कळ उठली आणि दानू एकदाच मोठ्याने ओरडला " मायं............... SS " म्हणून तो पावसाने लालबुंद झालेल्या मातीच्या चिखलात कोसळला.................दानुनं या जगाचा निरोप घेतला होता.सर्व मित्रांना किर्तीवंत व्हा...यशवंत व्हा...असा आशावाद देणारा तू स्वतःच या मित्राला सोडून दूर-दूर नि...घा...ला...स...का दानू ? का ?            #Written by Prasad Logade 

Monday, October 14, 2019

EK HOTA DANU (PART ONE)

#short story#New article#Blog                        " Ek hota Danu " (Part One) 
EK HOTA DANU (PART ONE)
#EK HOTA DANU (PART ONE) 
        एखाद्याच्या जीवनातला असा एखादा प्रसंग ज्यानं त्या व्यक्तीच सबंध आयुष्यच पलटून जाईल.जरा वेगळ्या अर्थात सांगायचं झालं तर आपण त्याला मातृभाषेत अचानक व्यवहारी कामकाजाला अधभुत कलाटणी देणारं वळण म्हणुया.एखादवेळी हे वळण आपल्याला किंवा समोरील व्यक्तीस सुखकारक अथवा दु:खकारकही असु शकते.तर अस हे अनाकलनीय आयुष्याचा वळण. त्याच्या एका टोकाकडुन पाहिले तर समोर गर्द दाट धुकं पसरलेलं दिसतंय तर अगदी दुसरीकडे पाहिलं तरीदेखील तीच स्थिती. म्हणूनच आपण पुढे भविष्यात काय घडणार याचा विचार न करता आपल्या दैनंदिन जिवनामध्ये अधिकाधिक आनंदी कसे रहाता येईल याचा कुठेतरी विचार करायला हवा.जिवनाच्या रहाटगाडग्यात असे काही सोनेरी दिवस...क्षण...असे काही निघून जातात की त्या भुतकाळतल्या आठवणी आपल्याला आठवत देखील नाहीत. तर काही गोष्टी मनाच्या पटलावर ईतक्या एकरुप होतात की त्या विसरायचा कितीजरी प्रयत्न केला तरी तो निष्क्रीय ठरतो.                                  तर आपण आयुष्यात अचानक आलेल्या वळणा विषयी बोलत होतो.माझ्या एका मित्राच्या बाबतीत असंच काहीसं घडल आणि ती गोष्ट मी आपल्याला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या मित्राच नाव आहे दिनेश पण ग्रामीण बहुतांशी अशिक्षीत वस्तीत राहुन त्याच नाव बदलत जावुन दिनेशचा 'दानू' केव्हा झाला हे त्याला देखील कळलं नाही. एका छोट्याशा खेड्यात...एका गरीब कुटुंबात जन्म झाला त्याचा.त्याची घरची परिस्थिती तशी हलाकीची होती.दानूचे वडील मोलमजुरी आणि आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कसेबसे संसाराचा अवघड गाढा रेटत होते.अशातच दानू गावच्या शाळेत शिकत होता. दानूची शाळेतील प्रगतीही चांगली होती. दानू शाळेतील सर्व शिक्षकांनचा लाडका विद्यार्थी झाला होता. संभाषण...चित्रकला...क्रीडा...अभ्यासात तो वर्गातील ईतर हुशार मुलांपेक्षा काकणभर सरस होता. दानूचा हा हुशारीचा रथ कुणीच रोखू शकत नव्हता.पण अचानक एका वादळानं दानूच्या सप्नांना भुईसपाट केलं.एके दिवशी दानूच्या वडिलांनी दानूला शाळेतून काढला.शाळेतील मुख्याध्यापक...शिक्षकांनी...एवढंच काय तर दानूच्या वर्गातील मुलांनी अश्रू ढाळत समजावले.पण त्या क्षणाला दानूचे वडील कुणाच ऐकण्या समजण्या पलीकडे गेले होते.शाळेच्या आवारात भयाण शांतता पसरली होती.मात्र त्या शांततेला चिरत दानूच्या हृदय पिळवटुन टाकणारं रडणं शाळेच्या आवारा बाहेर जात होत.शाळेला लागूनच असलेल्या रस्त्यावर मजा बघणारी मंडळी जमा झाली होती.ती गर्दी बघून दानूचा बाप भयंकर पिसाटला.त्याने दानूच्या गळ्याजवळ शर्ट पकडला आणि लालभडक धुरळयातून तसाच फरफटत त्याला झोपडीपाशी आणलं आणि आत ढकलून दिलं.एक गावरान शिवी हासडून मातीच्या लोटयातल पाणी गटागटा पिवू लागला.ईतक्या नदिवर धुणं धुण्यासाठी गेलेली दानूची आई आली.डोक्यावरची धुण्याची फाठी अंगणात टाकत तीनं दानूकडे धाव घेतली.ती येताना पहाताच दानूने दोन्ही हात तिच्या दिशेने उंचावले आणि त्याने तिला " मायं " म्हणुन घट्ट बिलगला.त्याची आई देखील त्याला काही प्रश्न नविचारता धाय मोकळुन रडू लागली.हाच तो क्षण ज्याने दानूच्या आयुष्याला एक वेगळ वळून दिलं.त्या शिक्षणाच्या सोनेरी स्वप्नांच्या वाटा बंद झाल्या होत्या.हि स्वप्नही काही वेळा बरी वाटतात.जशी आपण एखाद्या टि व्ही मालिकेतील एखादा भाग पहातो आणि दोन दिवसात विसरून देखील जातो.या स्वप्नांच देखील अगदी असंच आहे. रात्री पहावित आणि सकाळी विसरून जावित.हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की दानूचंही एक निरागस स्वप्न होतं.या व्यवहारी जगात अभ्यासाच्या ताकतीवर खुप-खुप मोठ व्हायचं.भविष्यात एखादी चांगल्या पगाराची नोकरी मिळवून मायं वडिलां सोबत आपल्या नव्या घरात सुखात रहायचं.पण वडिलांच्या निर्णयामुळे दानूच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात जमिनीवर येवून आदळले.मोठ होण्यासाठी लागतील तितके श्रम करायला तयार होता तो.या आकस्मिक आलेल्या वादळाने पुरता भांबावलेला होता.परिस्थिती समोर गुढगे टेकेल असं नियतीला देखील वाटलं असेल.पण तसं अजिबात नव्हते.संकट ही अशी भयंकर पीडा आहे कि ती एखाद्याच्या पाठी लागली कि ती पुरेपूर लागते.दानूच्या नशिबाने त्याच्याकडे पुर्णपणे पाठ फिरवली असली तरी त्याचा स्वताःवर विश्वास होता.पण मला त्याच्याकडे पाहून त्याच्या बाबतीत अस काही घडलं असेल अस किंचितही वाटत नव्हते. अशा प्रसंगात माणूस हसू शकतो याच गोष्टींचं मला आश्चर्य वाटत होते.या पेचात तो किंचित देखील तसुभर डगमगला नाही.आज तो त्या क्रुर नियतीशी झुंज देतोय.का माहिती आहे ? कारण त्याला ते गमावलेले ईप्सित साध्य करायचंय. त्याच हरवलेले स्वप्न सत्यात उतरायचंय.पण दानू अपयशातून सावरतो ना सावरतो एके दिवशी कोर्टातला एक माणूस शेतजमिन जप्तीचे कागद घेऊन आला.दानूच्या वडिलांना जोरानं हाक मारतो " हणम्या तुला कोर्टाकडून शेतजमिन जप्तीची नोटीस आलीय लवकर ये "हणम्या गोठयातून तोंड पाडून त्याच्या समोर उभा राहतो.दानूची माय झोपडी बाहेर येते.तीनं कमरेला खोचलेला पदर तोंडावर गच्च धरला. त्या माउलीच्या दोन्ही डोळ्यात जणु श्रावणातले ढग दाटुन आले.दानू देखील सर्वांना स्तब्ध होउन पहात होता.तो माणूस आणि हणम्या झोपडीपासुन एक फरलांग भर अंतरावर जावून बोलत होते.त्या दोघांचा आवाज या माय लेकरांना येत नव्हता. त्यामुळे दानूच्या मायंची घालमेल होत होती.पुर्वेकडुन येणारी सुर्य किरण डोळ्यात झोंबत होती.                    तो माणूस निघून जातो आणि अचानक हणम्या सावित्री म्हणुन तिथंच मटकन बसतो आणि टाहो फोडून शेतातील माती अंगभर लावून रडू लागतो.मायं आणि दानू विजेच्या वेगाने जावुन हणम्याला बिलगतात.तिघेही धाय मोकळुन रडु लागतात. त्यांना बघून गोठयातली जनावर हंबरू लागतात.पलिकडच्या रानात कुत्री भेसुर ओरडू लागतात.क्षणार्धात आता- आता असलेले ऊन नाहीसं होउन आभाळ ढंगांनी भरून आलं.दुरवर कुठेतरी विजांचा गडगडाट कानी येतो.हणम्या स्वतःला बायको पोराला सावरत उठतो आणि तिघही झोपडीत जातात.झोपडीत दार बंद होताच. विजा...सोसाट्याचा वारा...आणि पाऊसाच जणु तांडव चालू होतं...
#short story #New Story "Latest 
https://konkanbeauty8.blogspot.com          ( पुढील भागात ) #KONKAN BEAUTY
EK HOTA DANU (PART ONE)
# EK HOTA DANU (PART ONE)

Feature post

TANHAJI (The unsung warrior) 2020

✒Article by Prasad Logade    https://konkanbeauty8.blogspot.com 🔵TANHAJI (THE UNSUNG WARRIOR) Upcoming 2020 Bollywood blokbuster fil...