Wednesday, October 23, 2019

EK HOTA DANU ( PART 2 )

EK HOTA DANU  (PART 2)
# EK HOTA DANU  (PART 2)
#Konkan Beauty  #Short story               https://konkanbeauty8.blogspot.com    EK HOTA DANU (PART 2)                                  जसे दिवस पुढे-पुढे सरकत होते तसा दानूचा ईश्वर या संकल्पनेवरचा विश्वासच उडत चालला होता. देव नावाच्या प्रतिमांना या कागदी निर्जिव फोटोंना तो पाठीराखा मानत होता.पण आज सकाळ पासून दानू नेहमीपेक्षा अस्वस्थ वाटतो आहे.नित्य नेमाने देवाची पूजा करणारा दानू आज कोणत्यातरी वेगळ्या गुढ विश्वात हरवला होता.दानूला शाळा सोडून आठ एक वर्षे उलटली होती.दानूच्या पुढे निघुन गेलेले मित्र जेव्हा कधी मागे वळुन पहातात तेव्हा तो अपयशाच्या मैलाशी मनात सुख दुःखाची गोळाबेरीज करताना शरीरांन हतबल...परीस्थितीने बेजार...आणि मनांन निराश झालेला दिसतोय.आजपर्यंत मी दानूला अशा अवस्थेत कधीच पाहिला नव्हता.तरीही त्या खडतर परीस्थितीत तो उदरनिर्वाहाची केवीलवाणी धडपड करत होता.चातका प्रमाणे सुखाच्या एका कवडशाची डोळ्यात प्राण आणून वाट पहातोय.त्याच्या डोळयातले अश्रू सुकून गोठलेत.त्याचा तो अवतार पाहुन माझ्या अंतःकरणात प्रचंड  कालवाकालव झाली.दानूच्या या अवस्थेकडे पाहुन स्वैर खळखळत्या सागराच्या लाटा देखील क्षणभर वहाताना स्थिर होतात की काय असा भास निर्माण होतो.दानू दूर कुठेतरी पहात स्वतःशिच बडबडत होता." आमच्या सारख्या लोकांनी खोटं हसू जपत जगायचं असतं...का ?तर या व्यवहारी दुनियेच्या खोटया प्रतिष्ठेसाठी...खोटया माणसांसाठी...मृत्यूची वाट पहात जीर्ण झालेल्या स्वप्नांचे ताजमहाल बनवत एक-एक दिवसांनी मरायचं असतं.इथे या भुतलावर कधीही परत न येण्यासाठी...आणि अचानक बडबडताना थांबतो.आणि पुन्हा स्वतःशीच बोलुन लागतो."आजपर्यंत दानूच्या हक्काच मायं आणि बापाच्या आठवणी शिवाय तीसरा कुणीच नव्हता.हा काळ मात्र केव्हाच पुढे सरकला देखील आणि त्या जुन्या होऊन धुळ खात बसलेल्या आठवणींवर निरर्थक विचार करत बसलाय.हि दुनिया तुला वेडा समजतील कारण तू दुर्बल आहेस.अरे जे लोक ज्यांना आजपर्यंत तू माझे-माझे म्हणत आलास नां तीच लोक आज या घडीला तूला आधार देखील नाही देणार. त्या नंतर हिच माणसं हे जग तुझ नाही दानू सांगायला मागे पुढे देखील पाहणार नाहीत.आणि तुझ्या कल्पनेतल जग कोणत्यातरी कोनात असलच तर अतिशय विद्रूप असेल.दानू स्वतःशीच बोलू लागला."अरे ज्या माझ्या अशिक्षीत पण कष्टाळू बापानं या लोकांना अडचणीच्या वेळी मोलमजुरी करुन त्यांची वेळ मारून नेली.दिवस रात्रीचा विचार न करता मदत केली.त्यांच्या शेतात राब-राबला ती माणसं आज यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर माझ्या बापाला या दानूला साधी ओळख दाखवू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे...आम्ही झालो आहोत त्यांच्यासाठी या पृथ्वीवर रेंगाळणारे निरूपयोगी किडे...फक्त किडे"...येणारी जाणारी गर्दी दानूकडे संशयी नजरेने पाहतेय.दानूही त्यांच्याकडे पहातो.                                                              ती माणसं मोठ मोठयाने हसू लागतात त्याच्याकडे बघुन,पण त्याच्या डोळ्यांतुन अश्रू येतात झटकन.तरीही तो ते आनंदाचे सांगुन एक हात उंचावून,दुसरया हाताने अश्रू पुसतो पटकन.                                                    पण त्या उलट्या काळजाच्या माणसांना काहीच नसतं.कारण त्यांचा स्वार्थ साधुन झालेला होता.यशाच्या आनंदात ही माणसं नव्हे तर माणसाच्या वेषात वावणारी जनावर दानूला त्याच्या वडिलांना किती सहज विसरून गेली आहेत.कारण व्यवहाराने तो कुणाचा कुणीच नव्हता.पण काही नाती अशी असतात की त्यांना ठेवण्यासाठी नावच नसतात.अशा स्नेहाच्या नात्यांना आपण अनामिक स्नेहबंध म्हणुया.पण अशी काही नाती या असत्याच्या जगात सत्य आणि श्रेष्ठ असतात.तुमच्या यशाच्या वाटचालीत एखाद्या आनंदाच्या क्षणी या दानूला आपल्यात सामील करून घेता तर...?कधी नाही केली मैत्री तुम्ही त्याच्याशी...चार शब्द त्याचेही ऐकुन घेता तर...?तुम्हाला नाही वाटत या कथेतील दानूची हरवलेली स्वप्न जशीच्या तशी वास्तवात यावीत.त्यालाही मनोमन वाटतयं ते त्याच्या डोळ्यात दिसतंय.आपणही या दुनियेत यशस्वी होऊन दाखवावे.आणि मग ताठ मानेने आणि आनंदाने मनभरून एखाद्या खळखळणारया झरयासारख हसावं.खरंच असं घडले असतं तर...?हा भोळा दानू इतरांसाठी काही ना काही करत राहीला.आणि त्याला या कालचक्रात दोन सुखाचे क्षण सापडू नयेत.दानूचं एक ईवलस स्वप्न होतं कि त्यालाही तुमच्या आमच्यासारख यशस्वी व्हायचं होतं.पण हे त्याच स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं.दानू अचानक झोपेतून जागा झाला आणि "अरे हा दानू देखील यशस्वी होऊ शकतो...गरीब बापाचा गरीब मुलगा असलो म्हणून काय झालं...हा दानू यशस्वी होणारचं "...दानूचा हे बोलताना स्वतःवरचा ताबा सुटला होता.बेफाम होऊन तो काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता.ज्वराने अंग फणफणत होते.त्याचे शब्द आणि शरीराचा ताळमेळ चुकला होता.दानुचा आवाज हळूहळू ऐकु येईनासा झाला. तो तुम्हाला आम्हाला हे सांगण्यासाठी कि " मला देखील या तुमच्या यशाच्या वास्तव जगात तुमच्या प्रमाणे यशवंत व्हायचं होतं " चहोबाजूंनी आभाळ भरून आलं होतं...विजांसह वादळी पाऊस सुरू झाला होता. काळ्याकुटट अंधारात आधारासाठी कुणीच उरलं नव्हतं.त्याच्या सोबतीला होती भयाण शांतता. त्या शांततेला चिरत दुरवर स्मशानच्या दिशेला भेसुर कोल्ह्यानंच किंकाळीने ऐकू येत होतं.अचानक दानुच्या छातीत कळ उठली आणि दानू एकदाच मोठ्याने ओरडला " मायं............... SS " म्हणून तो पावसाने लालबुंद झालेल्या मातीच्या चिखलात कोसळला.................दानुनं या जगाचा निरोप घेतला होता.सर्व मित्रांना किर्तीवंत व्हा...यशवंत व्हा...असा आशावाद देणारा तू स्वतःच या मित्राला सोडून दूर-दूर नि...घा...ला...स...का दानू ? का ?            #Written by Prasad Logade 

No comments:

Post a Comment

Feature post

TANHAJI (The unsung warrior) 2020

✒Article by Prasad Logade    https://konkanbeauty8.blogspot.com 🔵TANHAJI (THE UNSUNG WARRIOR) Upcoming 2020 Bollywood blokbuster fil...