# EK HOTA DANU (PART 2) |
#KONKAN BEAUTY #konkan festivals #konkan food#History #konkan vacation palaces #konkan news#Ratnagiri tour #ganptipule in best hotels #short story #New articals #new blogs #gradations #tourist points
Wednesday, October 23, 2019
EK HOTA DANU ( PART 2 )
Monday, October 14, 2019
EK HOTA DANU (PART ONE)
#short story#New article#Blog " Ek hota Danu " (Part One)
एखाद्याच्या जीवनातला असा एखादा प्रसंग ज्यानं त्या व्यक्तीच सबंध आयुष्यच पलटून जाईल.जरा वेगळ्या अर्थात सांगायचं झालं तर आपण त्याला मातृभाषेत अचानक व्यवहारी कामकाजाला अधभुत कलाटणी देणारं वळण म्हणुया.एखादवेळी हे वळण आपल्याला किंवा समोरील व्यक्तीस सुखकारक अथवा दु:खकारकही असु शकते.तर अस हे अनाकलनीय आयुष्याचा वळण. त्याच्या एका टोकाकडुन पाहिले तर समोर गर्द दाट धुकं पसरलेलं दिसतंय तर अगदी दुसरीकडे पाहिलं तरीदेखील तीच स्थिती. म्हणूनच आपण पुढे भविष्यात काय घडणार याचा विचार न करता आपल्या दैनंदिन जिवनामध्ये अधिकाधिक आनंदी कसे रहाता येईल याचा कुठेतरी विचार करायला हवा.जिवनाच्या रहाटगाडग्यात असे काही सोनेरी दिवस...क्षण...असे काही निघून जातात की त्या भुतकाळतल्या आठवणी आपल्याला आठवत देखील नाहीत. तर काही गोष्टी मनाच्या पटलावर ईतक्या एकरुप होतात की त्या विसरायचा कितीजरी प्रयत्न केला तरी तो निष्क्रीय ठरतो. तर आपण आयुष्यात अचानक आलेल्या वळणा विषयी बोलत होतो.माझ्या एका मित्राच्या बाबतीत असंच काहीसं घडल आणि ती गोष्ट मी आपल्याला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या मित्राच नाव आहे दिनेश पण ग्रामीण बहुतांशी अशिक्षीत वस्तीत राहुन त्याच नाव बदलत जावुन दिनेशचा 'दानू' केव्हा झाला हे त्याला देखील कळलं नाही. एका छोट्याशा खेड्यात...एका गरीब कुटुंबात जन्म झाला त्याचा.त्याची घरची परिस्थिती तशी हलाकीची होती.दानूचे वडील मोलमजुरी आणि आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कसेबसे संसाराचा अवघड गाढा रेटत होते.अशातच दानू गावच्या शाळेत शिकत होता. दानूची शाळेतील प्रगतीही चांगली होती. दानू शाळेतील सर्व शिक्षकांनचा लाडका विद्यार्थी झाला होता. संभाषण...चित्रकला...क्रीडा...अभ्यासात तो वर्गातील ईतर हुशार मुलांपेक्षा काकणभर सरस होता. दानूचा हा हुशारीचा रथ कुणीच रोखू शकत नव्हता.पण अचानक एका वादळानं दानूच्या सप्नांना भुईसपाट केलं.एके दिवशी दानूच्या वडिलांनी दानूला शाळेतून काढला.शाळेतील मुख्याध्यापक...शिक्षकांनी...एवढंच काय तर दानूच्या वर्गातील मुलांनी अश्रू ढाळत समजावले.पण त्या क्षणाला दानूचे वडील कुणाच ऐकण्या समजण्या पलीकडे गेले होते.शाळेच्या आवारात भयाण शांतता पसरली होती.मात्र त्या शांततेला चिरत दानूच्या हृदय पिळवटुन टाकणारं रडणं शाळेच्या आवारा बाहेर जात होत.शाळेला लागूनच असलेल्या रस्त्यावर मजा बघणारी मंडळी जमा झाली होती.ती गर्दी बघून दानूचा बाप भयंकर पिसाटला.त्याने दानूच्या गळ्याजवळ शर्ट पकडला आणि लालभडक धुरळयातून तसाच फरफटत त्याला झोपडीपाशी आणलं आणि आत ढकलून दिलं.एक गावरान शिवी हासडून मातीच्या लोटयातल पाणी गटागटा पिवू लागला.ईतक्या नदिवर धुणं धुण्यासाठी गेलेली दानूची आई आली.डोक्यावरची धुण्याची फाठी अंगणात टाकत तीनं दानूकडे धाव घेतली.ती येताना पहाताच दानूने दोन्ही हात तिच्या दिशेने उंचावले आणि त्याने तिला " मायं " म्हणुन घट्ट बिलगला.त्याची आई देखील त्याला काही प्रश्न नविचारता धाय मोकळुन रडू लागली.हाच तो क्षण ज्याने दानूच्या आयुष्याला एक वेगळ वळून दिलं.त्या शिक्षणाच्या सोनेरी स्वप्नांच्या वाटा बंद झाल्या होत्या.हि स्वप्नही काही वेळा बरी वाटतात.जशी आपण एखाद्या टि व्ही मालिकेतील एखादा भाग पहातो आणि दोन दिवसात विसरून देखील जातो.या स्वप्नांच देखील अगदी असंच आहे. रात्री पहावित आणि सकाळी विसरून जावित.हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की दानूचंही एक निरागस स्वप्न होतं.या व्यवहारी जगात अभ्यासाच्या ताकतीवर खुप-खुप मोठ व्हायचं.भविष्यात एखादी चांगल्या पगाराची नोकरी मिळवून मायं वडिलां सोबत आपल्या नव्या घरात सुखात रहायचं.पण वडिलांच्या निर्णयामुळे दानूच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात जमिनीवर येवून आदळले.मोठ होण्यासाठी लागतील तितके श्रम करायला तयार होता तो.या आकस्मिक आलेल्या वादळाने पुरता भांबावलेला होता.परिस्थिती समोर गुढगे टेकेल असं नियतीला देखील वाटलं असेल.पण तसं अजिबात नव्हते.संकट ही अशी भयंकर पीडा आहे कि ती एखाद्याच्या पाठी लागली कि ती पुरेपूर लागते.दानूच्या नशिबाने त्याच्याकडे पुर्णपणे पाठ फिरवली असली तरी त्याचा स्वताःवर विश्वास होता.पण मला त्याच्याकडे पाहून त्याच्या बाबतीत अस काही घडलं असेल अस किंचितही वाटत नव्हते. अशा प्रसंगात माणूस हसू शकतो याच गोष्टींचं मला आश्चर्य वाटत होते.या पेचात तो किंचित देखील तसुभर डगमगला नाही.आज तो त्या क्रुर नियतीशी झुंज देतोय.का माहिती आहे ? कारण त्याला ते गमावलेले ईप्सित साध्य करायचंय. त्याच हरवलेले स्वप्न सत्यात उतरायचंय.पण दानू अपयशातून सावरतो ना सावरतो एके दिवशी कोर्टातला एक माणूस शेतजमिन जप्तीचे कागद घेऊन आला.दानूच्या वडिलांना जोरानं हाक मारतो " हणम्या तुला कोर्टाकडून शेतजमिन जप्तीची नोटीस आलीय लवकर ये "हणम्या गोठयातून तोंड पाडून त्याच्या समोर उभा राहतो.दानूची माय झोपडी बाहेर येते.तीनं कमरेला खोचलेला पदर तोंडावर गच्च धरला. त्या माउलीच्या दोन्ही डोळ्यात जणु श्रावणातले ढग दाटुन आले.दानू देखील सर्वांना स्तब्ध होउन पहात होता.तो माणूस आणि हणम्या झोपडीपासुन एक फरलांग भर अंतरावर जावून बोलत होते.त्या दोघांचा आवाज या माय लेकरांना येत नव्हता. त्यामुळे दानूच्या मायंची घालमेल होत होती.पुर्वेकडुन येणारी सुर्य किरण डोळ्यात झोंबत होती. तो माणूस निघून जातो आणि अचानक हणम्या सावित्री म्हणुन तिथंच मटकन बसतो आणि टाहो फोडून शेतातील माती अंगभर लावून रडू लागतो.मायं आणि दानू विजेच्या वेगाने जावुन हणम्याला बिलगतात.तिघेही धाय मोकळुन रडु लागतात. त्यांना बघून गोठयातली जनावर हंबरू लागतात.पलिकडच्या रानात कुत्री भेसुर ओरडू लागतात.क्षणार्धात आता- आता असलेले ऊन नाहीसं होउन आभाळ ढंगांनी भरून आलं.दुरवर कुठेतरी विजांचा गडगडाट कानी येतो.हणम्या स्वतःला बायको पोराला सावरत उठतो आणि तिघही झोपडीत जातात.झोपडीत दार बंद होताच. विजा...सोसाट्याचा वारा...आणि पाऊसाच जणु तांडव चालू होतं...
#short story #New Story "Latest
https://konkanbeauty8.blogspot.com ( पुढील भागात ) #KONKAN BEAUTY
#EK HOTA DANU (PART ONE) |
#short story #New Story "Latest
https://konkanbeauty8.blogspot.com ( पुढील भागात ) #KONKAN BEAUTY
# EK HOTA DANU (PART ONE) |
Saturday, October 5, 2019
Ratnanchi nagiri Ratnagiri
" रत्नांची नगरी रत्नागिरी " #History#Ratnagiri#City#Blog #KONKAN BEAUTY #Ratnanchi nagri Ratnagiri #Short story #New blog https://konkanbeauty8.blogspot.com
मित्रांनो गप्पांमध्ये रत्नागिरी हा टाॅपीक आला कि सर्व प्रथम सर्वांना आठवतो तो विस्तीर्ण निळाशार अथांग समुद्र...पायांशी हळूवार लगट करणारी पांढरी वाळू. नारळपाणी...हापूस आंबे...फणस...काजूगर...किती-किती म्हणुन जिभेचे लाड पुरवण्याचे थांबे...पण या सर्वांच्या आधी खरी ओळख येते ती रत्नागिरीच्या लालमातीत घडलेल्या लढवय्या त्या क्रांतीसुर्यांची ज्यांच्या बलाढ्य लेखणीनं...वक्तृत्वानं...ब्रिटीशांना सळो का पळो करून सोडल होतं.सारा हिंदूस्थान ज्यांच्या देशप्रेमानं भारावून गेला होता."स्वातंत्र्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारचं" अस इंग्रजांना ठणकाऊन सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक..."ने मजसी ने परत मात्रुभूमीला,सागरा प्राण तळमळला..."अशी मात्रुभूमीला आर्त साद घालणारे...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,"शिका आणि संघटीत व्हा" हा मंत्र देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक थोर मंडळींचा सहवास या भूमिला लागला आहे.त्या पवित्र भूमातेला साष्टांग दंडवत.
#Ratnanchi nagiri Ratnagiri |
# Ratnanchi nagiri Ratnagiri https://konkanbeauty8.blogspot.com |
Wednesday, October 2, 2019
FATHER OF THE NATION
https://konkanbeauty8.blogspot.com # FATHER OF THE NATION " महात्मा गांधी " # Mhatma Gandhi #KONKAN BEAUTY # History #Nation # 2 October #15 August 1947
मित्रांनो... 2 ऑक्टोबर भारतीय ईतिहासातल्या महामानवाची म्हणजेच आपले राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची 150 सावी जयंती.बापूंचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर काठियावाड,गुजरात येथे झाला. शालेय शिक्षण संपवून बापू वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे इ.स.1888 मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिवर्सिटी काॅलेज येथे वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते वकील बनले. असहकार आणि अहिंसेच्या तत्वांचा वापर सर्व प्रथम त्यांनी आफ्रिकेतिल भारतीयांना त्यांचे नागरि हक्क मिळवुन देण्यासाठी केला. इ.स.1891 मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले.सामान्य जिवनाचा प्रारंभ करण्यासाठी ते राजकोटला आले.मात्र एका इंग्रज अधिकार्यांच्या विरोधात गेल्याने त्यांना आपली वकील थांबवावी लागली. 1893 मध्ये त्यांनीब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ ( दक्षिण आफ्रिका )येथील दादा अब्दुला आणि कंपनी नावाच्या भारतीय कंपनीतील एका पदासाठी वर्षभरासाठी नियुक्ति झाली. इ.स.1915 मध्ये भारतात परत येताच बापूंनी चंपारणमधील कष्टकरी दुर्बल घटकांसाठीचा लढा उभा केला.शेतकरी वर्गावर लादलेला जुलमी कर व जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना संघटीत केले.बापूंच्या विचारांवर प्रभाव होता ते त्यांचे राजकीय गुरु भारतीय काॅग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखले.भारताचे राजकारण व देशातील अनेक सामाजिक राजकीय संकटांचा खरा परीचय गोखलेंनी बापूंना करून दिला होता.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मृत्यूनंतर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.इ.स.1921मध्ये काॅग्रेस नेतृत्वाची सुत्रे हातात घेतली.इ.स.1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात 250 मैल अंतर असलेल्या दांडी यात्रेच बापूंनी नेतृत्व केलं. इ.स.1939 सप्टेंबर मध्ये तडकाफडकी व्हाईसराॅयने जर्मनी विरूद्ध युध्द पुकारलं.हे बापूंना कळताच बापूंनी आणि काॅग्रेसने सरकारचा राजकीय पाठिंबा काढला.काॅग्रेसने 1942 साली ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली पण सरकारने त्याकडे कानाडोळा करत त्या विरुद्ध काॅग्रेसचेच्या नेत्यांना तुरूंगात डांबले.दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्य लढा अर्धवट टाकून मुस्लिम लीगने ब्रिटनला मदत केली. आणि बापूंच्या विरोधाला न जुमानता.मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची पाकिस्तानची मागणी केली. 1947 मध्ये ब्रिटिशांनी कुटनीती वापरून या हिंदूस्थानच्या भूमीची फाळणी केली.आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले. आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला ज्याची प्रत्येक भारतीय डोळयात प्राण आणुन वाट पहात होता.तो दिवस होता 15 ऑगस्ट इ.स.1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.बापूंनी आयुष्यभर अकरा तत्वांची उपासना केली. अहिंसा...सत्य...अस्तेय...ब्रम्हचर्य...अपरिग्रह...शरीरश्रम...आस्वाद...सर्वत्र भय वर्जन...सर्व धर्म समानता...स्वदेशी...स्पर्श भावना...निर्भयता या तत्वांना महात्मांनी आपल्या आचरणात आणले.बापूंच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय "अहिंसा दिन "म्हणून साजरा केला जातो. सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक...भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेल्या महामानवाच्या देशात आम्ही जन्मलो याचा आम्हां सर्व भारतीयांना अभिमान आहे.
#KONKAN BEAUTY
#India #Satyagrha #Ahinsa #Satya #Swatyantra #2 august #15 August 1947 https://konkanbeauty8.blogspot.com
# FATHER OF THE NATION |
#KONKAN BEAUTY
#India #Satyagrha #Ahinsa #Satya #Swatyantra #2 august #15 August 1947 https://konkanbeauty8.blogspot.com
Friday, September 27, 2019
Subscribe to:
Posts (Atom)
Feature post
TANHAJI (The unsung warrior) 2020
✒Article by Prasad Logade https://konkanbeauty8.blogspot.com 🔵TANHAJI (THE UNSUNG WARRIOR) Upcoming 2020 Bollywood blokbuster fil...
-
https://konkanbeauty8.blogspot.com # FATHER OF THE NATION " महात्मा गांधी " # Mhatma Gandhi #KONKAN BEAUTY # History #Na...
-
✒Article by Prasad Logade https://konkanbeauty8.blogspot.com 🔵TANHAJI (THE UNSUNG WARRIOR) Upcoming 2020 Bollywood blokbuster fil...
-
#HAPPY DIWALI 2019 Diwali is the biggest of all Hindu festivals .Deepawali is a combination of two words, deep meaning "light&qu...